About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, May 31, 2011

नाट्यगीत - हि कोमल सांज सखीची.......

नाट्यछटा - हि कोमल सांज सखीची.......

हि; कोमल सांज सखीची , वाट सजुनी खास जाण्याची
मज; लालसा हि युवतीस भेटण्याची,.......होईना रात्र समयाची,.......कोणास फिकी तयाची

रात्र नटुनी थाट पुनवेची, जागा फुलुनी खास चाफ्याची 
मम; नयनास पांघरे गंध त्याचा, परी चाहूल ना मज हरिणीची

मी; पाठविला तो गंध, परिमल चाफ्याचा
ना; उछ्वा्स मिळाला, तो संकेत तुझ्या भेटीचा  

हा समय सरुनी जाईना, आता गंधास धुंदी येईना
चाफा; दरवळणे थांबवील आता, कसे सखीस येईल पाहता

हि खास कसोटी कि, नेत्र थकुनी जाण्याची
मज पाहवेना वाट आता, अजुनी तिच्या येण्याची  


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Thursday, May 26, 2011

कविता:- मी पार असा गोंधळून जातो.......

रोजच्या जगण्यात माझ्या, मी किती काही ऐकत असतो
सगळेच मला खरे वाटते, आणि मी पार गोंधळून जातो

कष्टाची कमाई; हीच कशी खरी; असे कोणीतरी समजावून सांगतो
अरे; शेअर्सचा पैसा कमवायला पण; अभ्यास लागतो, हा विचार देखील पटून जातो  

घर आता कुठे घेतो? दर कमी होतील, म्हणून मी कधी वाट पाहतो
अरे; असे दर कधी कमी होतात का? असे म्हटले कुणी; तर लगेच जागा पहायलाही जातो

भ्रष्टाचार वाईट असतो, असे ऐकून मी सरळपणे वागत असतो
भ्रष्टाचार केला तरी; आजच्या जमान्यात पैसा बोलतो, हे नकळत  समजून जातो

हुजरेगिरी करून काय मिळणार? आपला स्वाभिमान असला पाहिजे, असे कोणी बोलतो
अरे; कामापुरते साहेबाशी गोड बोलायचे, असे कोणीतरी सांगणारा भेटतो

जास्त विचार करायचा नाही, विषयआर या पार करायचा; असा कोणीतरी बोलतो
तुकडा पाडून चालत नाही, “सुवर्णमध्य गाठावा हा विचार देखील पटून जातो

लग्न?; इतक्यात कुठे करतो? जरा सेटल हो!, म्हणून घरी "इतक्यात नकोअसे सांगतो
कोणीतरी; लवकर करून सुद्धा सेटल झाला, वय वाढायचे थांबते का?; हे ऐकून पुन्हा गोंधळून जातो

बायको नोकरीवाली नको, घर सांभाळणारी असावी; हा विचार साधा असतो
एकट्याने कमवून भागत नाही, आजकाल; नोकरीवाली बायको असावी; हा विचार सुधा कुठे वाईट असतो?

अहो; मोबाईल बाबतीत पण, मी पन्नास सल्ले ऐकतो
ऐकू येते ना राहू दे जुना, - अरे जरा लेटेस्ट घे; अश्या दोन्ही बोलण्याने गोंधळून जातो

मोठी गाडी; हि उधळपट्टी राहता, गरज झाली हे मी समजून घेतो
अरे; बस-रिक्षा असताना, कशाला  रे लागती कार? नुसती साली उधळपट्टी!!! हे पण मी पचवतो

एकच भारी बुटाचा; महागडा जोड घ्यावा, आणि दोन वर्षे वापरावा; असे म्हणून मी खरेदी करणार असतो
अरे स्वस्तात घे!!! आणि दर सहा महिन्याला नवीन बदल; असे ऐकून खरेदी रद्द करतो 

क्रिकेट!!! साला नुसता वेळेचा अपव्यय; आणि लाईटचा खर्च, आपल्याला काय मिळते त्यातूनअसे ऐकून बघत नाही
आपला देश त्यात एवढा पुढे आहे; कौतुक करायला कसला चिंधीपणा, असे कोण म्हणाले कि;आयपीएल बघायचे सोडत नाही

नोकरी मध्ये सुद्धा; सर्टीफिकेशनला महत्व असते; असे ऐकून चौकशी करतो
इतका अनुभव आला, आता कशाला सर्टीफिकेशन? असे ऐकून नाद सोडून देतो

ऑनसाईट कशाला हवे? नुसता देखावा असतो, तिकड राहणे अवघड; म्हणून मी कधी वाट्याला जात नाही
अरे; गेलास तर आत्ताच संधी आहेनंतर कधी कमावशील??? हा विचारही मन सोडीत नाही  

मस्त! सेल लागला आहे, स्वस्तात खरेदी करू; असे म्हणून धावत जातो
अरे! असल्या सेलमध्ये; खराब वस्तू असतात, म्हणून रिकाम्या हाती परत येतो

तब्येत चांगली राहायला, जिम पाहिजे!, असे ऐकून;माहिती काढून; लवकर उठायची तयारी करतो
आमच्या वेळेला कुठे जिम होत्या? नुसते चालले कि झाले!, असे ऐकले; कि आमचा बेत रद्द होतो

एवढे सगळे ऐकून; आणि परत सोडून देऊन, माझे काहीच नक्की झाले नाही
बघा; विचार करा; अहो! त्या माकडाच्या घराच्या गोष्टीसारखे; अश्याने कुणाचे; कधीच काही व्हायचे नाही

थोडक्यात काय?; जितके लोक तितक्या पद्धती, आता सोडला आहे नाद; फुकट सल्ला पाळण्याचा
आता ठरवले आहे; आपल्या मानत जे येईल, त्यावरच विचार करायचा आणि बस तुकडा पाडायचा


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Wednesday, May 25, 2011

हिंदी - भजन - श्याम मिलन को मन है मोहित


श्याम मिलन  को  मन  है  मोहित

श्याम मिलन को, मन है मोहित
कहाँ गए आपको,  अँखियाँ शोधित
जाओ, मोहन प्यारे चिरायु
थक गए नैन, कहाँ तुम्हे पाऊ                    ll ll    
 
बादल से पानी, बरसे तो जीवन
सूरज से धुप, बरसे तो उर्जा
चाँद से ठंडी, छाया श्यामल
तोहरा मुख दिख जाये, तो दिन सफल           ll ll

तोहरा; माखन खाने, का इकरार
भूल हुई जो किये, हम तकरार
दया करो, आ के; हमरा माखन चुरायो
बस भी करो, राह दिखत, अब अँखं भर आयो     ll ll
 
धन्य हम, जो गोकुल में जनमे
बस; श्याम ही श्याम, हमारे मन में
भाग हमारे, जो हुवा पुण्य अवतार
दिन ढल रहा, हम दर्शन को बेक़रार             ll ll

नहीं हमें दुःख, जो तुम माखन चुराओ
न लगे बुरा, गर तुम मटकी भी फोड़ो  
कुछ कारन; ही सही, तोहरे काम हम आवे
हम; क्या दे तुम्हे?, तुम खुद ये संसार चलावे     ll ll  

श्रीचरणरज,
  
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Tuesday, May 24, 2011

कविता:- सर्व काही चालवणारा, कोण असा सूत्रधार आहे?

सर्व काही चालवणाराकोण असा सूत्रधार आहे?  

आयुष्य कधीतरी, संपणार आहे
कोण जाणे, कसे तरणार आहे
जन्मून कश्याकरता, मारणार आहे?
याचा अर्थ, कोण सांगणार आहे?

बाल्य- तारुण्य, सरणार आहे
कधीतरी वार्धक्य, येणार आहे
सर्व साधून, काय गमक मिळणार आहे?
कधीतरी; या पाठ-कण्याला, आराम असा मिळणार आहे?

शाळा; शिक्षण, उच्च पदव्या,
पगार; बढती, बड्या नोकऱ्या
मुले, घर, गाडी....अरे किती त्या इच्छा
कधी संपणार, अश्या वाढत्या अपेक्षा?

वेड्या गर्दीत, भरधाव धावणे
लक्ष्य नक्की, ठाऊक नसणे
हेच का आहे, आयुष्य जगणे?
राम नक्की, कश्यात मानणे?

जीवन; ध्येय, आयुष्य; फलप्राप्ती
याची आहे, भव्य-दिव्य  व्याप्ती
गडबड धावपळ सोडून, एकदा कधी
तपास घेतला, पाहिजे आधी

जन्म कधी? कुठे? कुणाकडे?; हे आपल्या हातात नाही
आयुष्यात काय करावे?,हे सुद्धा आपण ठरवीत नाही
बोचऱ्या दुखा:परमेश्वरास बोलणे सोडत नाही
नांदत्या सुखातत्याला पळभरही आठवत नाही

माणूस जगणे-मरणे, चालणार आहे
निसर्ग; सूर्य; पाऊस; वारा, तसाच असणार आहे
प्रत्येक आयुष्यालापैलतीर हा असणार आहे
सर्व काही चालवणारा; आयुष्याचा अर्थ जाणणारा, कोण असा सूत्रधार आहे?  


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

LIKE Saarthbodh !!!