About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Wednesday, November 30, 2011

कविता - जुना मोबाईल.......

जुना मोबाईल.......


मला घरी आणताना; यांनी
जोरदार स्वगत; केले होते
घरी येणारा पहिलाच; मी
सगळ्यांना सरप्राईज; दिले होते

लहान बाळाला, घ्यावे तसे
मला घ्यायला सगळे, उत्सुक होते
चकाकणाऱ्या, मला ते
अगदी निरखून, हाताळत होते

आजी-आजोबा, वयस्कर
त्यांना फार काही, कळत नव्हते
पण एक, श्रीमंतीचा प्रकार
घरात आल्याचे, कौतुक होते

आई-बाबांचे, त्यांच्या ग्रुपमध्ये बोलणे झाले
स्नेक वर खेळून, चिंटूचे समाधान झाले
ताईने तिच्या मैत्रिणींना, "एस.एम.एस." पाठवले
खट्याळ बंटीने; किती तरी; मिस कॉल दिले

दादा संध्याकाळी; फिरायला म्हणून घेऊन गेला
बागेत भेटल्यावर तिला; मला दाखवू लागला
तिनेही माझे मग; खूप कोड-कौतुक केले
तिच्या नंबरला जरा; वेगळ्याच नावाने सेव्ह केले
पुष्कळ दिवस त्यांचे; मी कबुतराचे काम केले

असे सगळे माझे; नाविन्याचे दिवस होते
पैशाचे/बॅटरीचे; वेळेवर चार्जिंग होते
जसे दिवस गेले; तसा काळ बदलला; राव.......    काय सांगू
साला; प्रगतीपायी आमच्याच तरुण पिढीने; माझा घात केला

जुने कपडे, खरवडलेला चेहरा
सुटे ढिले अंग, असा मी झालो आहे
पूर्वी वरच्या खिशात, हृदयाजवळचा; मी
आज कपाटात, खितपत पडलो आहे

© Sachin P. Kulkarni
sachin.kulkarni78@gmail.com

3 comments:

  1. wonderful imagination, beautiful words to match.
    loved it. I also enjoyed your posts in Antaral.
    I have started marathi blog
    http://vijayjoshimarathiblog.wordpress.com

    thanks
    vijay joshi

    ReplyDelete

LIKE Saarthbodh !!!