About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Wednesday, September 28, 2011

भजन - सेवा पाऊलांची देई आई....


Bhajan published on Antaraal Diwali Ank 2011.
http://antaraal.com/e107_v0617/content.php?content.2504
-----------------------------------------------------------------------------------------------आज २८ सप्टेंबर २०११....... नवरात्री....... मायमाउली चरणी हे भजन समर्पित.



सेवा पाऊलांची देई आई.....

सेवा पाऊलांची, देई आई
सेवा पामराची, घेई 
होता तुझी कृपा, आई
दु:ख दैन्य, संपून जाई
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा पामराची घेई

पाप कितीक झाले, जड डोई
ठावे नाही कुठे, नशीब नेई 
काम काही करावे, म्हणता
हाती फळ लागत, नाही
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा लेकराची घेई

रूपे तुझी कितीक, आगळी
आम्हा मायेची, सावली
कधी दुर्गा, कधी अंबाबाई
वाघजाई कधी, फोड्जाई
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा पामराची घेई

माय, महिषासुरमर्दिनी
पद्मजावती; पद्मावती; वडजाई
माय तूच गं, तुळजाई
माझ्या कुलदेवीची, रूपे सारी
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा पामराची घेई

नाही पदरी पुण्य, ना धन
चित्त राही न, श्रीयावान
दु:ख सुटता सुटत, नाही
माय पावगे तू, लवकरी
सेवा पाऊलांची देई आई.....सेवा लेकराची घेई 


मायमाउली चरणरज,
© सचिन पु. कुलकर्णी 

sachin.kulkarni78@gmail.com


 

Saturday, September 24, 2011

कविता - वेळ.......त्याच्याविना,.......त्याच्यासवे

कुण्या एकीचा सखा-जोडीदार दूर गावी गेला, लवकर परत यायचा त्याने शब्द दिला होता, त्याला येणे न जमल्यामुळे, तिचा जो विरह झाला त्या दिवशीची सकाळ, संध्याकाळ आणि रात्र तिला फार वेगळी वाटली, पण दुसऱ्याच दिवशी तिचा आयुष्याचा जोडीदार परत आला असताना तिला तीच सकाळ, संध्याकाळ आणि रात्र कशी वाटली याचे हे वर्णन.
-----------------------------------------------------------------------------------------------------
गेला तो दूरगावी, मी डोळे वाटेस लावूनी
शब्द येण्याचा होता ठरला, जो केवळ शब्दच राहिला
 
सांजसंध्या अंधारली, किडे पाखरे किरकीरली
संध्याही कोमेजून गेली, मी फक्त वाट पाहिली
 
रात्र घनघोर काळोखली , तिमिर भरून चितारली
आसवे दाटून आली, रात्रीतही मी फक्त वाट पाहिली
 
दिवस भकास उजाडला, कालचा विसर नाही पडला
करता काम जरी मी, वाटेकडे नजर लागली....... मी फक्त वाट पाहिली
 
पुढचा दिवस, पुन्हा संध्याकाळ आली, आणि गावावरून तो परतून आला,
 
मी डोळे वाटेस लावलेले, त्याचे पाऊल दूर पडलेले
संकेत मला समजलेले, मी धावत उंबऱ्यात होते
 
सांजसंध्या अवतरली, मनमोहक मोहरली
त्याच्यासावे कितीक प्रहर, मी सुखसागरात हरपली
 
रात्र सुंदर अंबरली , आज कसलीच उणीव न उरली
त्याच्या मिठीत अशी काही, माझी रात्र मंतरली
 
दिवस दिव्य उजाडला, तिमिर सारून प्रकाशला
मनी रात्रीचा आठव, माझी साथ सोबत त्याला
 
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Wednesday, September 21, 2011

कविता - दिवस.......पालटलेले

एका त्याची/तिची व्यथा, जी कधीच संपली नाही. वयाप्रमाणे आणि सावलीप्रमाणे देहाला कधीच सोडत नव्हती; अशी व्यथा. कुठलेंच काम त्यांचे होत नव्हते; जणू त्यांचे दु:ख काही संपतच नव्हते. सगळी आशाच सोडली होती; कारण आता कुठलेच काम न होण्याची सवयच लागली होती.
घेतला जन्म, अवतार कार्याला
पण तो दिवस आला, त्याची/ तिची सगळी कामे अडचण न येता पार पडू लागली. हे कसे झाले यावर त्याचा / तिचा विश्वास बसे ना. तो अनुभव इथे शब्दात मांडायचा केलेला एक प्रयत्न.  
-------------------------------------------------------------------------------------------------
भोग संगे, जडून देहाला
आयुष्य झडता, काळ सरायाला
एके दिनी परत, पुढच्या प्रवासाला

केले हात पुढे, जीवनास भेटण्यासी  
वाटले धरेल, मजला असा उराशी
नियम जगण्याचे, उमगले विखारी
नित्य याचना करून, मी भिकारी

रमलो; पचलो, दुनियेत या
अस्तित्व सांडोन, लागलो भटकाया
दाही दिशा हाच, राहिला मार्ग
मी एकटा, कसा ओळखू असली मार्ग

हेलावत शोधू लागलो, किनारा
ना कधी निवारा, फक्त डोक्यात वारा
पाण्यास शोधता, ते मृगजळ निघाले
मी सावलीस जाता, वृक्ष निष्पर्ण झाले

सरळ वाट धरिता, तरी पायी मोडे काटा
माझ्या हर एक निश्चयाला, मिळे नवा फाटा
वेळ बरी माझी, तरी काळ रुसलेला
या सगळ्या खटाटोपी,  मी आयुष्य ओघळलेला

आज झाले अजब, धरती अंबरास मिळाली
मला वाटते माझी, सारी व्यथा होळीस मिळाली
आज मी पाणी शोधता, वरुनी मेघ बरसला
कुठे सावलीस पाहता, पुरा बगीचा मिळाला

जुनाच; रोजचाच त्रास, असा काही निवळला
भले पुरता बुजला वार, तरी घाव सोडून गेला
पालटले दिवस तरी, घाव उठावदार आहे
जुन्या दिवसांचा आठव ठेवून, पाय धरतीस आहे

©  सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Friday, September 9, 2011

कविता - पाऊस.......नवसंजीवन

तप्त निखारा जैसा, वैशाख हा पेटलेला
रापून अंग थकले, उष्मा निवळलेला

वाट पाहतो जैसी, आतुरला चातक वेडा
बरसेल कधी घन, मिळेल उसासा थोडा

मेघही रुसला जैसी, सांगून सखी येईना
येरझार जीवाची, समजूत मनीची होईना

आला क्षण तो एके दिनी, दाटले मेघ श्यामल ऐसे
भेटता एकमेकास ते, गडगडाट हर्ष जैसा भासे

सुटला संयम; बरसले बेजोड, जुळविले नाते
अंबरातून धरतीस प्रेम; जीवन, पाण्यातून वाहते

आल्हाद घेई जागा, सारुनी दूर हा उष्मा
कण कण संजीवला, दूर पळविले ग्रीष्मा

धरती आकंठ प्याली, झेललेला थेंब अन् थेंब
जैसी गंगाच उगमली, देई प्रसाद तो भोळा सांब

होते पाणीच ते, दिसले गढूळ कईकांस
ते धरतीस ठावे, त्यास ती माने अमृतासम

काडीसम वाळले गवत, निष्पर्ण हर एक वृक्ष
हि वेळ दर वेळची, त्यास माहित होणार ते रुक्ष

होते तग धरुनी; त्यांचे वरती वाळके; हर एक अंग
परी धरतीत रोवले मूळ, पुनर्जीवनाचे ठाम मनी मर्म

परी जाईल समय; एके दिनी हाही, मिळेल नवजीवन
कदर ज्याची त्याला, हर एक थेंब करी नवनिर्माण

कैक म्हणती; हा किती बरसला, साचला; ना वाटही जाण्याला
त्या वृक्षास विचारा मोल; ज्याच्या फुलविले निष्पर्ण देहाला  

© सचिन पु. कुलकर्णी

LIKE Saarthbodh !!!