About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, October 20, 2011

लेख:- दिवाळी.......

दिवाळी पुढच्या महिन्यात आहे, दिवाळी दोन आठवड्यावर आली, असे म्हणता म्हणता दिवाळी आली...नेहमीच येते ती. आपल्या भारतीय संस्कृतीमधील एक सगळ्यात मोठा सण. अगदी लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दिवाळीची आस असते. 
आपल्या संस्कृतीमध्ये साजरे करण्याला फार महत्व आहे. मित्र-मैत्रिणी /नातेवाईक यांना भेटणे, मिठाई वाटणे, फराळ करणे. जसे आपण एखाद्या क्रिकेटच्या सामन्याकरता एकदम तयारीत असतो , सुट्टी काढून/लवकर घरी येऊन, सामना जिंकल्यावरची तयारी म्हणून फटाके काढून ठेवतो, सोबत चहा आणि जोडीला मित्र, कशी धम्माल मजा, तसेच दिवाळीची देखील खास तयारी असते, दिवाळीत काय घ्यायचे, नवीन कपडे, नवीन वस्तू, त्याच्या पैशाची जुळणी आधीपासून करणे, ऑफिसमध्ये आधीपासूनच सुट्टीसाठी बोलून ठेवणे, त्यातून एखाद्याच दिवसाकरिता कामावर जावे लागत असल्यास ठरल्याप्रमाणे आजारी पडणे आणि मोठ्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेणे. मुलगा/मुलगी बाहेरगावी नोकरीला असल्यास ते एसटी मधून लटकून तरंगत येणे; खरे तर त्रासाचे पण दिवाळीला घरी जायची ओढ या सगळ्यावर मात करून जाते. असे आपण सगळे अगदी तयारीत असतो.

पण आता; आजकाल कुठे असे वाटू लागले आहे का, कि दिवाळीत काय करायचे? का फक्त सुट्टी काढून मित्र/मैत्रिणींना भेटायचे . आजकाल दिवाळीकरिता जो फराळ असतो तो अगदी रोजच्या खाण्यात सुद्धा असतो. मला आठवते मी लहान असताना, दिवाळी म्हणली कि घरात महिन्याच्या यादीत जादा तेल/ साखर आणून सुट्टीच्या दिवशी आदल्या आठवड्यात  चिवडा, शंकरपाळ्या, लाडू, चकली इत्यादीचा घाणा घरात व्हायचा, आणि असा खास दिवाळीचा खाऊ फक्त दिवाळीतच असायचा, पण आजकाल मॉल संस्कृती आली आहे, त्यात असलेसे बरेच पदार्थ सर्रास मिळतात, त्यामुळे हा एक पूर्वीच्या आणि आताच्या पद्धतीत फरक आहे, पूर्वी कपडे घेणे म्हणजे सुद्धा दिवाळीच निमित्त असायचे, आता याच मॉल आणि इतर दुकानात खूप साऱ्या सवलती देऊन कपडे आणि इतर वस्तू वर्षभर विकले जातात. मित्र-मैत्रिणींना भेटणे तर फेसबुक /ईमेल मुळे  रोजचेच झाले आहे. थोडक्यात काय तर नकळत आपल्याला पूर्वीच्या काही पद्धतींना नवे अथवा पर्यायी स्वरूप मिळाले आहे.

म्हणून आपण दिवाळीत काही करत नाहीं असे नाही, नेहमीच्या पद्धती आपण पाळतच असतो. पण आजकाल काही जण मला असे बोलताना आढळतात कि दिवाळीत काही विशेष नाही........ याचा अर्थ आपल्याला आता दिवाळी हा वार्षिक रतीब तर नाही ना वाटत? कारण क्रिकेट आणि इतर वाढदिवस वगैरे दिवस पण साजरे करायची एक रीत रूढ झाली आहे; होत आहे, मग दिवाळीत काय असे खास? ...असे म्हणायला संधीं आहे का? हा काही नकारात्मक विचार वगैरे मुळीच नाही, पण काही जणांना  त्याच गोष्टी आपण इतर दिवशी पण करतो म्हणून काही विशेष वाटत नाही. कारण तसेही आंघोळ तर आपण रोजच करतो, पण दिवाळीचे पहिल्या आंघोळीचे महत्व तर आहेच, ते कुणी काही म्हणल्याने बदलणार तर नाही. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याला सतत बदल आवडतो, नेहमीच्या पद्धतीत  बदल झाला तर ती गोष्ट अधिक भावते. तर आपण या दिवाळीत असे काय करू शकतो; कि ज्याने पुन्हा एकदा आपण सारे त्या दिवाळीच्या दिवसाची लहान मुलाप्रमाणे वाट पाहू?

विचार करायला लागल्यावर काही बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात येऊ लागल्या , त्यातील काही तर मी आणि माझे मित्र दरवर्षी करतो देखील.  जसे कि मनुष्य संस्कृतीमधील दिवाळी हा मोठा  सण, तर आपण हा फक्त आपल्यापुरता मर्यादित न ठेवता आपले मित्र/मैत्रिणी सोबत जोडतो, त्याप्रमाणेच आपण जर आपल्या समाजातील आजूबाजूला असणाऱ्या; पण  परिस्थितीने अडचणीत असलेल्या लोकांना जोडले तर काय मजा येईल? आपल्या प्रत्येकाच्या गावात काही वृद्धाश्रम / अनाथालय असतात (जसे पुण्यात मातोश्री वृद्धाश्रम) ( मी काही एखाद्या संस्थेची जाहिरात वगैरे इथे करत नाही आहे, फक्त एखादा संदर्भ असावा म्हणून हा उल्लेख ), अगदी हे नसेल तर गरीब लोक असतात, आपले जुने पण खराब नसलेले कपडे; जर एकत्र करून अशा लोकांना/संस्थाना देऊ शकतो.
एखाद्या दिवाळीत वृद्धाश्रमातील आजी/आजोबांना काही फुले/फराळ देऊन त्यांना नमस्कार केला तर? त्यांनी  थरथरत्या  हातांनी दिलेल्या आशिर्वादाला कुठे तोड आहे का? एखाद्या गरीब स्त्री/माणसला आपलेच जुने; पण खराब नसलेले कपडे देऊ शकतो, कुणा गरीब मुलाला काही पेन/वह्या देऊ शकतो (जसे  एखादी आश्रम शाळा), एखाद्या अनवाणी गरीब मुलाला साधी चप्पल, दिवाळी सोबत येणाऱ्या थंडीसाठी चादर देऊ शकतो; या आपण दिलेल्या मायेच्या पांघरुणाची ऊब निश्चित माणुसकीला अधोरेखित करणारी ठरेल. दिवाळी हा दिव्यांचा / रोषणाईचा सण, एखाद्या गरीब घरात पिवळा उजेड पडणारा दिवा असेल आणि त्याला आपण लख्ख शुभ्र उजेड पडणारा दिवा बसवून दिला तर घरासमोर लावलेल्या आकाशकंदीलापेक्षा त्या उजेडाला निश्चित एक वेगळी झळाळी असेल, त्याचा उजेड परमेश्वराच्या चरणापर्यंत नक्कीच पोचेल.

पैसे;वस्तू, कपडे; दागिने
चमचमीत खाऊ, आणि पक्वान्ने 
हि नेहमीची, पद्धत सगळी
जरा वाटते, दिवाळी करावी वेगळी


अशी मदत केल्याने समोरच्या माणसाच्या डोळ्यात "कोण म्हणतो देव नाही, तो तर या मदत करणाऱ्या माणसांच्या रुपात आहे" असे भाव प्रत्येकाला नक्की दिसतील. चांगल्या गोष्टी करण्याला काही मर्यादा नाहीत, प्रत्येकाला जसे सुचेल तसे तो काहीतरी विधायक कार्य नक्की करू शकतो. मग काय म्हणता मित्र/मैत्रिणींनो यावर्षी काही तरी वेगळे करूयात? बघा असे केल्याने आपल्याला सुद्धा पुढच्या दिवाळीची आस नेहमीपेक्षा जरा जास्तच वाटेल. 
तुम्ही; आम्ही असे विधायक काही केले तर नक्की दोन-चार लोक अजून येऊन मिळतील, अजूनतरी चांगेल काम करणाऱ्या लोकांना  दाद द्यावी आणि आपणही मदत करावी इतकी माणुसकी शिल्लक आहे, आपण ती वाढवूयात. तुम्हा सर्वांना हि दिवाळी भरभराटीची, चांगल्या आरोग्याची जावो हीच माझ्याकडून शुभेच्छा!!!  


देवाने दिला, माणसाचा जन्म
नको राहुयात, स्वत:मध्ये मग्न
आहे समाज, गरजू आजूबाजूला
जरा जागवू, माणुसकीचा झरा

जो खरेच, असा विचार करेल
आपल्याच देशबांधवांना, मदत करेल
तो माणूस म्हणून, स्वत:च धन्य पावेल
त्याच्या कामाचा प्रकाश, ईश्वरचरणी पोचेल

© सचिन पु. कुलकर्णी

Monday, October 10, 2011

कविता - आता अजूनही मी, त्यास दान मागताहे

माणूस जन्माला आल्यापासून काही ना काहीतरी सतत देवाकडे मागत असतो. त्याच्या लहानपणी त्याला बोलता येत नसते, काही समजत नसते तेंव्हा त्याचे घरचे लोक त्याच्याकरिता देवाकडे काहीबाही मागत असतात. थोडक्यात एक सवय अशी लागते कि देव हा हट्ट करण्याकरताच बनला आहे अशी भावना होते .त्यावर लिहिलेली हि कविता.
------------------------------------------------------
आता अजूनही मी, त्यास दान मागताहे
झाली कितीक वर्षे, मी याचक बनून आहे

स्मरतात त्या दिसांचे, भलेबुरे क्षण पुराणे
न होती मला प्रतिभा, केवळ दिखावे पहाणे

ते माझेच लोक होते, याचना माझ्याचसाठी
परमेश्वरास बोलती कि, दे यास चीज खास काही

होऊन आज मोठा, ती आदत जखडून आहे
या न त्या कारणाला, मी दान मागताहे

स्मरती जुन्या कितीत्या, मागोव्यातील लाख इच्छा  
पुरल्या अनेक त्यातील, आज बोली नवीन आहे 

लागले व्यसन फुकाचे, देवावरी हक्क थोपलाहे
त्यास सुटका तिथून नाही, मी घरात कोंडलाहे

देवही भला बिचारा, पुरवी लळे वाकुडे ते
त्यास माहित असावे कदाचित, मज जन्म याचकाचा आहे  

© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Sunday, October 9, 2011

भजन - सदेह आम्ही भान हरपुनी, ऐसे भजनी रंगतो

कस्तुरीगंध अन् अमृतगोडी, सदा आम्ही चाखतो
सदेह आम्ही भान हरपुनी, जेंव्हा भजनी रंगतो

दोन हाती; दोन पंक्ती, करिता त्यांचा समेळ
किणकिण करी टाळ ती, जोडी परमेश्वरी नाळ

हाती घेता एकतारी, चेतविती दिशा चारी
तार छेडता आम्हा सोडी, आणुनी भक्तीमार्गावरी

धीरगंभीर ऐसा तो, वाजविता दोन्ही अंग
थाप पडता तो मृदुंग, आम्ही ईश्वरचरणी दंग

मधुर निरंतर गुंजे, श्वास तिचा भात्यावरी
पेटी वाजता ती संगे, आम्ही होतो निरंकारी

खळाळते निर्मळ पाणी, नाद ऐसा चिपळीला
आवाज पडता कानी ऐसा, रंगताती हरिलीला

कर दोन कमळ जैसे, टाळी ऐसी पडताना
भ्रमर गुंजारती तैसा, नादब्रह्म निर्मिताना


© सचिन पु. कुलकर्णी 
sachin.kulkarni78@gmail.com

भजन - हरीभक्त आम्ही, हरीनाम जागर जागर


हरीभक्त आम्ही, हरीनाम जागर जागर
मार्ग कितीक मोक्षाचे, परी भक्तिमार्ग सुकर

काम धाम कष्ट सारे, आटापिटा पोटासाठी
आम्ही स्वार्थी जन ,जग चालवी तो जगजेठी

संसारात किती केले, परी शेवटी काही न उरे
जन्म-मृत्यू दोन टोके, जुळविता देह नुरे

ज्याचा शेवट माहित होता, त्याच्या आरंभी लागलो
निम्मे सरता; सारे कळता, देवाजीच्या पायी लागलो

सत्य पचवा सावकाश, जन्म मातीत शेवट मातीस
उपाधी कमविली कितीक, शेवटी राख हीच उपमा त्यास

जन्म माणसाचा घेतला, केला बहुत ऐसा साजरा
नरजन्मी कमवून काही, चुकव चौऱ्याऐंशीचा फेरा

नित्य कर्म चालू असो द्या, त्यात नका पाडू अंतर
राहो मनी भाव तयाचा, नाम हरीचे जपा निरंतर

© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Thursday, October 6, 2011

गझल - हरनजर हमारी उनकी खातिर तरसती है


दिलोंकी बात है तो, धड़कन यही बताती है
दिल की धड़कन, हो...हो..., ये दिल भी उनकी; खातिर धड़कता है

जिंदगी में प्यार, इक  नई बात लगती है
प्यार का नशा पुराना, बस हम नए; खिलाडी है

सफ़र में वो हमसफ़र, तो सफ़र की क्या बात है
जब वो सफ़रमें, तो हम बेखबर मुसाफिर है

श्याम रोजकी मगर, आजकल अजीब लगती है
वो न आयी तो, बेवजा वो श्याम है

नजर की बात है, तो वो क्यूँ नजर; नहीं आती
हरनजर हमारी, उनकी खातिर तरसती है

© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com


Sunday, October 2, 2011

हिंदी - भजन - हे मेरे प्रभू, नरवीर नरोत्तम


हे मेरे प्रभू, नरवीर नरोत्तम
हर युग इक, अवतार पुरुषोत्तम
हर अवतार में, जन दु:ख संवारे
कलियुगमें, दत्तअवतार पधारे
तिन शिरोवाले, तीनो लोक संभाले
छे हात तुम्हारे, षडरिपू संहारे
शंख चक्र गदा लेके, आप अवतारे
हम पामर दिन अब, आप के सहारे
पढ़ चुका चरित, आप की लीला अदभुत
दुःख न चुकत, न कृपा कंही दिखत
प्रभुजी अब न खेलो, और ऑंखमिचौली
देखो हर पल मेरी, हर घटिका बीत चली
सूरजसे तेज तुम्हारा, दिव्य मुखकमल
चाँद भी मुरझाये, ऐसी कृपा शीतल
दोनों बाजु खड़े, दो दो श्वान
पैरोतले रिक्त जगह, जहाँ मेरा प्राण
आप परम परमात्मा, आप हो दिव्य विभूति
तुम सम न तारणहार, ये हम जानत भलीभाती
कंधे पे लेकर चले, क्या छुपाया है झोली में
तुम्हरी कृपा का इक टुकड़ा, डालदो हमारे जीवन में

गुरुमहाराज चरणरज,
सचिन पु. कुलकर्णी

© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

LIKE Saarthbodh !!!