About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Total Pageviews

Contact Me

Email:- sachin.kulkarni78@gmail.com
FB ID:- sachin.kulkarni78
FB Page:- https://www.facebook.com/saarthbodh
Please Sign In to Join me on www.saarthbodh.com

Labels Text

Labels-
Click to view other posts under below label/Type.

Share Saarthbodh with your Friends/ Groups It

Popular Posts - Text

Popular Posts by Readers -

Click on the Title/Icon below to read entire post.

Popular Posts

Latest Posts -

Wednesday, November 30, 2011

कविता - जुना मोबाईल.......

जुना मोबाईल.......


मला घरी आणताना; यांनी
जोरदार स्वगत; केले होते
घरी येणारा पहिलाच; मी
सगळ्यांना सरप्राईज; दिले होते

लहान बाळाला, घ्यावे तसे
मला घ्यायला सगळे, उत्सुक होते
चकाकणाऱ्या, मला ते
अगदी निरखून, हाताळत होते

आजी-आजोबा, वयस्कर
त्यांना फार काही, कळत नव्हते
पण एक, श्रीमंतीचा प्रकार
घरात आल्याचे, कौतुक होते

आई-बाबांचे, त्यांच्या ग्रुपमध्ये बोलणे झाले
स्नेक वर खेळून, चिंटूचे समाधान झाले
ताईने तिच्या मैत्रिणींना, "एस.एम.एस." पाठवले
खट्याळ बंटीने; किती तरी; मिस कॉल दिले

दादा संध्याकाळी; फिरायला म्हणून घेऊन गेला
बागेत भेटल्यावर तिला; मला दाखवू लागला
तिनेही माझे मग; खूप कोड-कौतुक केले
तिच्या नंबरला जरा; वेगळ्याच नावाने सेव्ह केले
पुष्कळ दिवस त्यांचे; मी कबुतराचे काम केले

असे सगळे माझे; नाविन्याचे दिवस होते
पैशाचे/बॅटरीचे; वेळेवर चार्जिंग होते
जसे दिवस गेले; तसा काळ बदलला; राव.......    काय सांगू
साला; प्रगतीपायी आमच्याच तरुण पिढीने; माझा घात केला

जुने कपडे, खरवडलेला चेहरा
सुटे ढिले अंग, असा मी झालो आहे
पूर्वी वरच्या खिशात, हृदयाजवळचा; मी
आज कपाटात, खितपत पडलो आहे

© Sachin P. Kulkarni
sachin.kulkarni78@gmail.com

Monday, November 21, 2011

चारोळी - १© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Tuesday, November 8, 2011

कविता - देऊळ.......गावापासून दूर टेकडीवर, एक वास्तू अशी खास होती
जागेसाठी भांडणाऱ्यांनी, देवाला रहायला दिलेली; जागा होती

सताड उघडी मातकट पायवाट, एकटीच दुहेरी पळत होती
काही मोजक्या भक्तांच्या पायात, कधीतरी घुटमळत होती

भिंती ढाचा तसे जुने, ऊन; वादळवारे खात निर्धास्त उभे होते
वेळेला देवघर, क्षणी भक्तांस  निवारा,  असे त्यांचे काम होते

दाराबाहेर उभ्या वृंदावनात, तुळस वाऱ्यावर डोलत होती
अधूनमधून मिळणाऱ्या पाण्यावर, बहरायला ती शिकली होती

प्रवेश करता देवळात, कासव समोर साष्टांग होते
नजरेनेच पोसतो देव त्यास, हेच ते सुचवीत होते

पुढे जाता घनगर्द; गंभीर, सुबक छान गाभारा होता
ध्यान भग्न न हो देवाचे, म्हणून त्याचा पहारा होता

सुबक थोडी सावळी अशी, मूर्ती छान स्थापिली होती
आजवर ठेवलेल्या श्रद्धेची; ती, मूर्तिमंत आकृती होती

देवासमोर मिणमिणणारी, एकच लहानगी दिवटी होती
भक्त कोण आहे आला, एवढेच दाखवायची जबादारी होती

अशा थोड्या प्रकाशात, उदबत्ती दरवळून सोबतीस होती
जळून जाता पवित्र होऊन, भक्तांच्या ललाटी मिरवीत होती

आतून पुन्हा बाहेर निघता, उंबरठ्याची पथारी होती
हीच ती जागा; जिथे हर एक, पाठ-पाऊले; वळत होती

©  सचिन पु कुलकर्णी  
sachin.kulkarni78@gmail.com

LIKE Saarthbodh !!!