About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, January 10, 2012

कविता - एकटेपण

आजची रात्र वेगळी, ना कुणी सोबतीला
मनातही विचार ना, आज खास कुठला

आजवर ना दिला, वेळ एकदाही स्वत:ला
म्हणोनीच एकट्याने, वाटे गाठले स्वत:ला

असा गेला ना वेळ, कधी एकटेच बसण्यात
करू लागलो विचार, काय तथ्य एकलेपणात

राहण्यात एकटे असेल, काय वेगळी बात?
चंद्र; सूर्य ऐसेच का, विशाल नभी शोभतात

एकलीच येतात माणसे, एकलीच जातात
परी जोडीदारासवेत, सारे आयुष्य घालवतात

कशी थोर माणसे, एकलेपणास जिंकतात
उगाच काय त्यास, विचारवंत म्हणतात

म्हणोनीच काय एकटा, देव राहतो देवळात
असेल मिळत त्यास, देवपण एकलेपणात

आज मी हि बसलो, हा काय विचार करत
सुचले नेमके हेच, मला आज एकटेपणात

© सचिन पु. कुलकर्णी 
www.saarthbodh.com

LIKE Saarthbodh !!!