About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, December 5, 2013

कविता - ऐश्वर्य

एकत्रित असलेली काही नि:स्वार्थी नाती आणि काही वेळा काही मित्र/ मैत्रिणी ;
काळागणिक संवेदना अन् नाते विसरून व्यवहारी बनतात, अशाच काही व्यवहारी
लोकांच्यात; एकट्या पडलेल्या एका नि:स्वार्थी मनाचे चित्रण मांडण्याचा; प्रयत्न.


Thursday, November 14, 2013

लेख - हिंदी अनुवाद - "सहस्त्रचंदप्रभा"

आदरणीय थोर गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांनी सप्टेंबर २०१३ मध्ये वयाची ८१ वर्षे पूर्ण केली, 
यानिमित्त माझा मित्र श्री अतींद्र सरवडीकर याने लिहिलेल्या "सहस्त्रचंदप्रभा" या लेखाचा हिंदी अनुवाद 
मी केला आहे. तो "संगीत कला विहार " या मासिकाच्या नोव्हेंबर -२०१३ च्या अंकात छापून आला 
आहे, लेख आणि फेसबुक लिंक इथे जोडत आहे. अतींद्रचा मी खास आभारी आहे कारण; त्याच्यामुळे 
प्रभाताईं सारख्या महान व्यक्तिप्रति काही सेवा घडून आली. संगीत कला विहारचे देखील मी आभार मानतो.

Friday, November 8, 2013

कविता -अक्षरबद्ध - पु. ल. देशपांडे

आज ८ नोव्हेंबर; आपले लाडके आदरणीय पु. ल. देशपांडे म्हणजे भाई यांचा वाढदिवस, माझी हि अक्षरबद्ध (Acrostic) कविता त्यांना समर्पित. हि कविता स्नेहदीप (न्यू यॉर्क) च्या यंदाच्या २०१३ च्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्टावर छापण्यात आली आहे, हा दिवाळी अंक  पु. लं.च्या स्मरणार्थ -"सबकुछ पु. ल. "- पु. ल. विशेषांक बनवून; स्नेहदीपने दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला आहे. स्नेहदीप चे मनापासून आभार.


Tuesday, November 5, 2013

कविता - बंध

"रंगदीप २०१३" या न्यूयॉर्क/न्यूजर्सी  येथील दिवाळी अंकाच्या "समस्यापूर्ती कविता स्पर्धा"
या सदरात माझ्या या कवितेस प्रथम क्रमांक मिळाला आहे.
थोर कवयित्री "श्रीमती शांताजी शेळके" यांच्या एका कवितेत
"पुराण शिंपल्यामधुन गाज तीच ये पुन्हा,
तळात खोल जागल्या अनंत जन्मिंच्या खुणा "
या ओळी आहेत.  आदरणीय शांताजी शेळके यांच्या वरील ओळींच्या सूत्राला धरून पुढे ओळी लिहायच्या, असे स्पर्धेचे उद्दिष्ट होते. माझी कविता इथे सादर करीत आहे.

Friday, November 1, 2013

कविता - दिवाळी

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपणा सर्वांना हि दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची, आरोग्याची जावो !!!


Monday, October 14, 2013

अभंग - चरणी ठेवुनी माथा

शब्दांमध्ये ताकद असते, या शब्दांना सुरांची सजावट केली कि ते अधिक प्रभावी होतात, अर्थ भावनेसाहित ऐकाणाऱ्यापर्यंत पोहोचतो.
माझा अभंग "चरणी ठेवुनी माथा…" असाच सजवला गेला आहे.

चाल आणि गायन आहे माझा मित्र श्री. अतिंद्र सरवडीकर याचे,
शब्द - सचिन पु. कुलकर्णी (
www.saarthbodh.com)
संगीत संयोजन श्री. ओंकार गोखले,
ध्वनी तंत्रज्ञ श्री. संदीप इंदप,
ध्वनी मुद्रण - स्वरसंवाद, मुंबई.

गाण्याचे सर्व हक्क संबंधित कलाकारांकडे आरक्षित.

अभंगाची लिंक इथे देत आहे.

http://www.youtube.com/watch?v=erzGKkzpYbc

शब्द -

चरणी ठेवुनी माथा.......गुरुराया वंदिन माझा...   ll धृ ll

तैसे माझे मन व्याकुळले, चरणी विसावले,
श्री चरणा, गुरु चरणा                    ll १ ll


वनी काननी तुजला, शोधिले त्रिभुवनी या
कोण तुजवीण त्राता, दाव पाऊले सत्वरा ll २ ll 


दैन्य दु:ख झाले बहु, पापवासना चित्ता
कसा सावरू आता, कृपा करी गुरुराया ll ३ ll


चरणी ठेवुनी माथा.......गुरुराया वंदिन माझा ...

- ll श्री गुरुदेव दत्त ll

Wednesday, August 28, 2013

कविता - सुदामा

आज जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्णास साष्टंग नमन. श्रीकृष्णाने त्याच्या अवतारी अनेकविध भूमिका पार पाडल्या, कधी पुत्र म्हणून, भाऊ म्हणून,
गुरु म्हणून तर कधी मित्र म्हणून. त्याच्या मित्र प्रेमाचे; सुदामा भेटीचे हे वर्णन.


Tuesday, August 20, 2013

कविता - बहिणाई

आज २० ऑगस्ट २०१३ - रक्षाबंधना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!
बहिण-भावाचे नाते जपणारी आजची राखी पौर्णिमा,
बहिणीकरिता लिहिलेली हि कविता सप्रेम सादर करत आहे.


Friday, July 26, 2013

लेख - ४ निमिष, ३९ क्षण - अग्निसराव

आमच्या संस्थेत (कंपनी) अग्निसराव (फायर ड्रील) नुकताच पार पडला, त्यातील एकूणच अनुभव इथे मांडत आहे. लेख मुद्दामच पूर्ण मराठीत लिहित आहे, काही शब्दांना कंसात पर्यायी आंग्ल शब्द लिहिले आहेत. या लेखातील नावे / व्यक्ती काल्पनिक आहेत, कुणाचा संदर्भ जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.  

आमच्या संस्थेत सहामाही अग्निसराव असतो, या सरावात मी एक सहायक/अधीक्षक (फायर वॉर्डन) म्हणून काम करतो. मागल्या वर्षी देखील मी हे काम केले होते. या वर्षी गेल्या महिन्याभरापासून पुन्हा बैठका (मिटिंग) चालू झाल्या. नेहमीप्रमाणे मारून मुटकून/ भरीला पडून काही लोक सहायक म्हणून तयार करावे लागले, काही स्वत:हून आले. आपल्या देशात स्वत:च्या आयुष्याचीच मुळी लोकांना किंमत नाही, आणि एकूणच एखादी प्रक्रिया/शिस्त पाळायची उदासीनता हि यातून प्रकर्षाने जाणवली.

सुरुवातीच्या बैठकीला बिचारा संस्थेचा व्यवस्थापक (ऐडमिन) आणि तीन-चार टाळकी (मी त्यातील एक सुपीक) उपस्थित होतो.काही केल्या लोक येईनात. व्यवस्थापक फारच उदास आणि वैतागला होता, लोक नसले कि कामाचा असा विचका होतो ! हे समजले.मी त्याला म्हणालो तू नको काळजी करू; पुढच्या वेळी सगळे लोक आणि तीन-चार जास्तच येतील; मी तुला खात्री देतो. हे ऐकून तो एकदम चपापला, मला म्हणला कसे काय? मी म्हणालो मी सगळ्यांना सांगेन कि या हे खूप महत्वाचे आहे, आग लागल्यावर कायकरावे हे माहित असायलाच पाहिजे वगैरे वगैरे....तो फार आनंदी झाला नाही कारण हे सरकारी भाषण त्याने 
सगळ्यांना आधी ऐकवलेहोतेच, त्याला मनात वाटत होते कि फार लोक येणार नाहीत. तो म्हणाला उद्या याचवेळी परत बैठक (मिटिंग) घेऊ, सगळ्यांनीआपल्या आपल्या मजल्यावरील इतर सहायकांना कृपया आणा. मग बाकी लोक निघाले मी हळूच व्यवस्थापकाला बाजूला नेले आणि त्याला माझ्या डोक्यातील कल्पना सांगितली आता जरा त्याच्या डोळ्यात आनंद आणि डोक्यात प्रकाश पडलेला जाणवला; त्याला आता लोक येतील अशी जर आशा वाटू लागली. 

आम्ही निघालो, मी जागेवर जाऊन व्यवस्थापकाला निरोपकावर (मेसेंजर) संदेश दिला (पिंग केले), कि उद्या सगळे लोक येतील, फक्त मी सांगितले तसे कर; तुझे नाव येणार नाही... पण कोणी काही म्हणलेच तुला; तर फक्त "हो; विचार चाललाय" असे म्हण. मी त्याला जे सांगायचे ते आधी सांगून टाकले होतेच. मी संध्याकाळी जी सकाळची तीन-चार टाळकी होती त्यांना घेऊन चहाला गेलो आणि सहज एकाला म्हणालो; अरे! तुझ्या सदऱ्याचे माप/ क्रमांक ( टी-शर्ट साईझ) काय आहे रे?. तो म्हणाला, का रे? एकदम मधेच सदरा का आठवला तुला? मी म्हणालो; अरे आता मिळणार ना सदरा- (टी-शर्ट!) मग योग्य मापाचा नको का मिळायला?. तो म्हणाला कसला सदरा (टी-शर्ट)?, मी म्हणलो; अरे आपण अग्निसरावमधे मदत करणार आहोत ना! मग 
आपल्याला एक एक सदरा देणार आहेत. बास!!! झाले सगळ्यांचे कान उभे राहिले. मला विचारले; कोण म्हणले?? कोण म्हणले??, मी म्हणलो, अरे... कोणी म्हणाले नाही पण मी मगाशी व्यवस्थापक समूहामध्ये (क्युबिकल) गेलो होतो तिथे कोणीतरी एकजण बाबा....म्हणत होता , कोण होता ते दिसले नाही. मी दुसऱ्याशी पाठमोरा बोलत होतो ना; काय माहित!.काय आहे!

मी आणखी वर पावशेर हाणला कि जे आले नाहीत त्यांना आता सांगायला नकोच; जे इथून पुढच्या सगळ्या बैठकांना हजार राहणार आहेत त्यांनाच सदरे मिळणार आहेत. आता आपण हे कुणालाच सांगयला नकोच, आपणच आता फक्त सदरे घेऊ छान पैकी, काय रे? मी हळूच म्हणालो! नेहा तू केद्याला बोलू नकोस हं आणि राहुल तू पण प्रीतीला बोलू नकोस. बसू दे त्यांना तसेच, आले नाहीत ना मिटींगला जरा खिजवूच त्यांना. झाले माझी गोळी योग्य ठिकाणी लागली होती. नेहा केद्याला आणि राहुल प्रीतीला न बोलल्याशिवाय राहणे शक्यच नव्हते. चहा झाला आणि सगळे आपापल्या जागेवर गेले, नेहा, राहुल; केद्या आणि प्रीतीला अनुक्रमे निरोपकावर पकडून पकडून सदरयाबद्दल सांगत होते. माझे त्यांच्याकडे बारीक लक्ष होते, जणू काहीतरी कडक आतली बातमी हाती लागली आहे; असा बातमीदाराचा आव आणून दोघे एकदम सुसाट सुटले होते. हेच कारण काढून राहुलने प्रीतीला चहा प्यायला उपहारगृहात नेल्याचे मी पाहिले. त्याला पण तिच्याबरोबर जायला कारण हवेच होते. मी मजा बघत होतो. दुसऱ्या दिवशी बैठकीच्या स्थळी काय सांगू भावांनो-बहिणींनो आमच्या आधी वीस एक लोक तिथे आधीच सरड्यासारखे तत्परतेने येउन उभे होते, इतर वेळी कलटी हाणणारे लोक एका टी-शर्ट पायी आगीशी खेळायला तयार झाले होते ..हा हा हा !!!. केद्या आणि प्रीती हे अनुक्रमे त्यांच्या त्यांच्या बातमिदाराबरोबर छायाचीत्रकारासारखे (क्यामेरामन राहुल के साथ प्रीती .....अशा पद्धतीत) उभे होते. केद्या आणि प्रीतीच्या डोळ्यात आपल्या मित्रानी/ मैत्रिणीनी आपल्याला काय भारी गोष्ट मिळणार याची आतली बातमी सुमडीत दिल्याबद्दलची सद्भावना म्हणा प्रेमभावना म्हणा डोळ्यात चमकत होती.
आम्हाला सरावाच्या दिवशी आम्ही सहायक आहोत अशी ओळख इतरांना पटावी म्हणून पिवळे चकाकणारे अंगरखे आणि गळ्यात "अग्निसराव सहायक" असे छोटे ओळखपत्र (आयडी कार्ड) असलेली माळ घालायला दिली, आधीच संस्थेच्या नावाचे मंगळसूत्र (आयडी कार्ड) किंवा कमरेला छल्ला (योयो- खेचली जाणारी गोलाकार वस्तू ) होताच, त्यात हि भर. 

आमची ती बैठक यशस्वी पार पडली, व्यवस्थापक माझ्याकडे बघून हसला; त्याला नंतर एकट्याला सुमडीत घेऊन मी लोकांना आधी बोलल्याप्रमाणे अग्नीसरावासाठी येण्याबद्दल कसे पेटवले हे सांगितले; माझी करामत विसकटून सांगितली. तसा तो पण एकदम खुश झाला.तो म्हणाला; अरे! नंतर लोक म्हणतील ना! काय झाले सदऱ्याचे, मग काय उत्तरे देणार?, मी म्हणालो "तुमच्या पूर्ण समूहात मी फक्त असे सदऱ्याबद्दल ऐकले आहे आणि कोण बोलले ते मी पहिले नाही"; हे मी आधीच सर्व लोकांना स्पष्ट केले आहे. आणि मी म्हणालो मेल्या..इतकी वर्षे हे काम करतोस ना...लोकांना सांगायचे आर्थिक अडचणी (बजेट इशु) आहेत. लोक गप बसतील रे ! तू नको काळजी करू . माझे हे असले सरकरी उत्तर ऐकून त्याला पण आधार वाटला. नंतरच्या बैठकीत आमचा बाकी सगळा ठराव ; "काय करायचे, काय नाही करायचे" याचा सराव झाला. अग्निसरावाची तारीख ठरली. कुणी कुठल्या बाजूच्या लोकांना कुठल्या जिन्यातून बाहेर काढायचे; उपस्थित लोकांची आधी जाऊन संख्या (काउंट) घेणे, बैठक खोल्या (मिटिंग रूम), प्रसाधनगृहात (टोएलेट) कोणी पहायचे? या सगळ्याची महिला आणि पुरूष प्रकारात योग्य विभागणी केली.

पण काही फितुरांनी अग्निसरावाची तारीख आपल्या जवळच्या मित्रांना-मैत्रिणींना सांगितली असावी- कारण सरावाच्या एक चतुर्थांश प्रहर (पंधरा मिनीट) आधीच; बरेच लोक उदवाहन (लिफ्ट) वापरून खाली टपरीवर जाताना दिसले. हा सगळा विचित्र प्रकार आहे, लोकांना स्वत;च्या सुरक्षेच्या गोष्टी तरी समजून घ्यायची मानसिकता अंगात यायला किती काळ लोटावा लागणार आहे! हे देवासच ठाऊक.

मी तयार होतो. मला मागच्या वर्षीचा अनुभव पाठीशी होताच, पण मागच्या वर्षी माझी एक-दोन लोकांबरोबर कचकच झाली होती, एक-दोन साहेब लोकांनी (म्यानेजर) मला उडवून लावले होते; कसले अग्निसराव करता?, आमची महत्वाची कामे सुपूर्त करायची (टास्क डिलिव्हरी) वेळ आहे आज- वगैरे वगैरे. मी जरा गडबडला होतो त्यावेळी..बघा आम्हाला असे आदेश आहेत; कुणी वर राहता कामा नये, सगळ्यांनी खाली जायला हवे वगैरे वगैरे..... मी अडखळत बोललो होतो, पण त्या साहेबाने माझे ऐकले नव्हते आणि काम करत बसला होता, त्याचे इतर एक-दोन लोक पण मग टरकून थांबले होते आणि मी तिथून सटकलो होतो. पण 
यावर्षी मी मुरलो होतो, आधीच खात्री करून घेतली; तो साहेब नव्हता; बहुतेक संस्था (कंपनी) सोडून गेला असावा! पण तसल्या जातकुळीचे एक-दोन जण; चेहऱ्यावरूनच खाष्ट वाटणारे; लोक मला दिसले होते. 

मी एकाचे नाव लक्षात ठेवले होते. झाले ती घटिका आली "किर्र-टीर्र", "क्यांव-ट्यावं" भोंगे आणि इतर सहायकांच्या शिट्ट्या वाजायला लागल्या, मी जोरजोरात ओरडू लागलो, चला जागेवरून उठा !!! हा आग लागल्याचा इशारा आहे, उठा !!!(क्षणभर एवढा उद्दीपित झालो कि उठा !जागे व्हा!! स्वातंत्र्य मिळवा !!! असे ओरडावे कि काय इतके माझ्या अंगात संचारले होते), जागा सोडा आणि या बाजूने जिन्याच्या डाव्या बाजूने तळ मजल्यावर चला, उठा!!! मी पुन्हा जोरजोरात ओरडू लागलो. एक-दोन लोक जागेवर फक्त सरकले, काही लोक नुसतेच कबुतरासारखे इकडेतिकडे माना हलवून बघू लागले, काही जण निवांत डुलकी मारायच्या तयारीत होते; ते मनातल्या मनात (अरे!! काय हे??) असे बोलताना चटकन दिसून गेले. काही जण भ्रमणध्वनी (मोबाईल) बघ, बाजुच्याकडे बघून हसणे; असले प्रकार करू लागले. स्त्रीवर्ग एकूणच या सगळ्यापासून अनभिज्ञ आणि अरसिक दिसत होता.

मी लांबूनच ज्या साहेबाचे नाव लक्षात ठेवले होते; त्याचे नाव ओरडून म्हणालो, हरी!!! ऐकू येत नाही का भोंगा 
वाजतोय? चला उठा जागेवरून, मजला रिकामा करा. हरी जागेवरून न उठता म्हणाल आमचे महत्वाचे काम पूर्ण करायचे आहे; झाले मला वाटले होते तेच झाले, याने नाट लावलाच, त्याचे इतर सहकारी पण उठले नाहीत. एवढ्या सगळ्यात ६० क्षण (सेकंद), एक निमिष (मिनिट) पेक्षा जास्त वेळ गेला होता. पण मी पूर्ण तयार होतो, मी त्याला जोरदार आवाजात उत्तर दिले; हो! तुम्ही काम पूर्ण कराल; पण सुदैवाने जगलात तर. आता मात्र हरी चपापला, त्याला एकदम हा चेंडू डोक्यावरून गेला, अं अं पण हा सराव (प्रक्टिस सेशन) आहे! असे पटकन म्हणला, मी म्हणालो सराव केलात तर सराव होईल खऱ्या आगीच्या परिस्थतीत तुम्हाला काय करावे याची माहिती आहे का? संस्था (कंपनी) हे सर्व तुमच्या सुरक्षेसाठी करते; तुम्हाला जाणीव असायला हवी याची. मी हरीला अक्षरश: सुनावत होतो; हरी भजन ऐकल्याप्रमाणे माझ्याकडे फक्त बघत होता. मी त्याला वर अजून उकसवला म्हणालो तुमच्या सारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ (सिनिअर) माणसाने असे वागले तर तुमचे सहकारी/अनुयायी (टीम मेंबर) आदर्श रोल मॉडेल) ठेवतील?,  मी त्याची ज्येष्ठता दाखवून त्याच्या वर्मावर बोट ठेवले होते. तुम्ही संस्थेचे धोरण/नियम पाळण्याची अशी प्रथा पाडून देणार आहात काय बाकीच्यांना?... मी अजून आवाज चढवला; हरी चरफडला माझ्यावर. काहीतरी निरुपयोगी (युसलेस) वगैरे असे वैतागून म्हणत संगणक(ल्यापटोप) उचलायला लागला. मी पुन्हा ओरडलो संगणक महत्वाचा नाही साहेब तुमच्या आयुष्यापेक्षा. त्याने माझ्याकडे सूचक नजरेने; रागाने बघितले असावे असे मला वाटले, कि तुला बघतो नंतर पगारवाढीला (अप्रेजल) वगैरे वगैरे...पण मला काय फरक पडणार होता, त्याच्या आणि माझ्या कार्यक्षेत्राचा (डोमेन) दुरुदूर संबंध नव्हता......तो माझा कधी साहेब झाला नसता ....हा हा हा...जाम मज्जा आली. 

हरी जागेवरून निघाला होता, मी शिखर सर केले होते जणू. त्याचे बाकीचे अनुयायी "आपल्या साहेबाला ओरडणारा हा कोण माणूस?" अशा नजरेने माझ्याकडे बघू लागले. कोणीतरी आपल्या साहेबाला टर्रीबाज दम भरलाय; आपण हे "याची देही; याची डोळा" पाहतोय; असा विलक्षण अप्राप्य आनंद त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात तरळून गेलेला दिसला. आता मला दहा हत्तींचे बळ आले, मी खेकसलो... अरे उठा, सगळ्या वस्तू इथेच सोडा, आणि चटकन खाली उतरा, पळू नका; शिस्तीत जा. झाले मी सगळ्यांना जागा सोडण्यास भाग पाडले; मग मी बैठकीच्या खोल्या, पुरुष प्रसाधनगृह तपासले; त्यावर पिवळे 
चिकटणारे कागदाचे चिटोरे (यल्लो पोस्ट इट स्टांप) चीटकवले; जेणेकरून इतर; दुसऱ्या तपास फेरीच्या सहायकांना कळावे कि इथे कोणीतरी तपासून गेले आहे. मी पण भोकरातून बी सटकावी तसा सटकलो आणि खाली तळमजल्यावर गेलो. तिकडे जमलेल्या लोकांना रांगेत उभे करून; "तुमचे आयुष्य महत्वाचे आहे", तुम्ही काय काळजी घ्यावी?; अग्निसरावाला का पाठींबा द्यावा?, अग्निसरावाचे महत्व; फायदे; उद्दिष्ट; आगीपासून कसे वाचायचे याची महत्वाची आणि उपयुक्त माहिती/ धडे दिले जात होते.

मी माझा अहवालाचा कागद (रिपोर्ट) संस्था मुख्यव्यवस्थापकाकडे दिला; त्यावर त्याने "४ निमिष, ३ क्षण" (४मिनिट, ३ सेकंद); अशी मी हजेरी/पोहोच (रिपोर्टिंग) दिल्याची वेळ टाकली; त्याने माझे आभार मानले; मी पण त्याचे आभार मानले. एकूणच मी आता या अग्नी सरावाला आणि तो सराव पूर्ण करण्याच्या पद्धतीला चांगलाच सरावलो होतो.

माझा यावर्षीचा सराव चांगला आणि दिलेल्या उद्दिष्टाच्या वेळेत झाला होता. भले कोणी अनोळखी हरी माझ्यावर चरफडला 
होता; पण खऱ्या श्रीहरिला स्मरून मी माझ्या कर्तव्यात; माझे १००% योगदान (काँट्रीब्युशन)दिले होते, याचा मला जास्त 
आनंद होता. 

© www.saarthbodh.com
सचिन पु. कुलकर्णी
FB ID - sachin.kulkarni78 

Monday, July 22, 2013

Saarthbodh- Mobile App available now

Namaste,

Saarthbodh- Mobile App available now on:-


Please download and keep reading....www.saarthbodh.com

Dhanyawad,
Sachin P. Kulkarni
www.saarthbodh.com

भजन - समर्पण

आज २२ जुलै २०१३ - गुरुपौर्णिमा - श्री. दत्तगुरु महाराजांच्या चरणी हे भजन समर्पित.


Wednesday, May 22, 2013

Tuesday, April 30, 2013

कविता - नकाब

पाशवी अत्याचार झालेल्या दिल्लीमधील मुलीचे दु:खद निधन झाले होतेआज मध्यप्रदेशमधील त्या पिडीत चिमुकलीनेही प्राण सोडले.
जनावरांना लाजवेल असे हीन, घृणास्पद वर्तन करणाऱ्या आणि देवभाबडे असे निरागस जीवन उध्वस्त करणाऱ्या या नराधमांना फाशीची शिक्षाच झाली पाहिजे.




Thursday, April 25, 2013

ll जय हनुमान ll

आज २४ एप्रिल २०१३, हनुमान जयंती, सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

ll जय श्रीराम, जय हनुमान ll 






















Friday, April 19, 2013

भजन - श्रीराम नाम

आज १९ एप्रिल २०१३, "श्रीराम नवमी", श्री रामराया चरणी माझे हे भजन समर्पित... 


Friday, March 29, 2013

गझल - हाल-ए-दिल

उर्दू शब्द- अर्थ 

जहमत - मनाचा अस्वस्थपणा 
खयाल - विचार
अहेसास - भावना, भाव 
हाल-ए-दिल - हृदयातील गोष्ट 
बयाँ - व्यक्त करणे, सांगणे 
इत्र - सुगंध






Friday, March 22, 2013

कविता - दुष्काळ

सगळीकडे पडलेल्या भयाण दुष्काळात; आपण माणुसकी दाखवून जमेल त्या प्रकारे मदत केली पाहिजे.
किमान रंगपंचमी आणि होळी खेळून पाणी वाया घालवू नकोया; आणि भारताचे सुजाण आणि सुशिक्षित
नागरिक असल्याचा प्रत्यय जगाला देऊयात.

Thursday, March 14, 2013

उपक्रम - मार्च-२०१३ दिनदर्शिका

मी आणि माझ्या मित्रांनी २०१३ चे "Table Top Calendar" बनवले आहे, त्यातील मार्च महिन्यातील माझी कविता आणि निलेशचे छायाचित्र.
हे  Calendar विकून आलेले पैसे आम्ही वनवासी मुलांकरिता मदत म्हणून दिले.


Friday, March 1, 2013

ओवी - २

नमस्कार !!!
मी लिहिलेल्या अजून काही "ओवी" आज इथे आणि माझ्या वेबसाईट वर प्रकाशित करत आहे.
आपण सर्वांनी वाचाव्यात आणि आवडल्या तर तुमच्या मित्र/मैत्रिणींना वाचायला द्याव्यात; अशी विनंती.


Wednesday, February 27, 2013

कविता - वेड

आज "मराठी भाषा दिन", आपली भाषा आणि संस्कृती हि अनेक लोकांनी  
त्यांच्या प्रतिभेने एका अलौकिक उंचीवर नेउन ठेवली आहे. आपल्या भाषेला  
अनेक क्षेत्रातल्या लोकांनी कष्ट आणि कलेची उपासना करून एक वैभव ,  
एक थाट , एक डौल दिला आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नावे देत 
बसलो तर यादी खूपच मोठी होईल. मग तो कुठलाही कलाकार असो; कलाकार 
हा जरा वेगळ्याच वाटेने जाऊन, इतरे जनांप्रमाणे ठराविक पठडीत जगता
त्याच्या कलेचे स्वप्न उराशी बाळगून, एक वेगळी वाट चालत असतो.  
सुरुवातीला अनेक अडथळे, अडचणी येतात; पण कलाकाराच्या मनात कलेचे 
वेड असते, तो ती कला जगत असतो....यशस्वी होत जातोकलाकार ध्येय वेडा 
असतो. असे अनेक उत्तुंग कलाकार आपण गायन, वादन, संगीतखेळ, चित्रपट
मूर्तीकला, चित्रकला, लिखाणअभिनय, व्यंगचित्र इत्यादी माध्यमातून  
आजपर्यंत पाहिले आहेत. त्या समस्त व्यक्तिमत्वांना माझ्याकडून हि कविता 
सादर समर्पित. आपण देखील असे काही वेड स्वत:ला लावून घेता येते का पाहूयात.

LIKE Saarthbodh !!!