About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Wednesday, February 27, 2013

कविता - वेड

आज "मराठी भाषा दिन", आपली भाषा आणि संस्कृती हि अनेक लोकांनी  
त्यांच्या प्रतिभेने एका अलौकिक उंचीवर नेउन ठेवली आहे. आपल्या भाषेला  
अनेक क्षेत्रातल्या लोकांनी कष्ट आणि कलेची उपासना करून एक वैभव ,  
एक थाट , एक डौल दिला आहे. असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नावे देत 
बसलो तर यादी खूपच मोठी होईल. मग तो कुठलाही कलाकार असो; कलाकार 
हा जरा वेगळ्याच वाटेने जाऊन, इतरे जनांप्रमाणे ठराविक पठडीत जगता
त्याच्या कलेचे स्वप्न उराशी बाळगून, एक वेगळी वाट चालत असतो.  
सुरुवातीला अनेक अडथळे, अडचणी येतात; पण कलाकाराच्या मनात कलेचे 
वेड असते, तो ती कला जगत असतो....यशस्वी होत जातोकलाकार ध्येय वेडा 
असतो. असे अनेक उत्तुंग कलाकार आपण गायन, वादन, संगीतखेळ, चित्रपट
मूर्तीकला, चित्रकला, लिखाणअभिनय, व्यंगचित्र इत्यादी माध्यमातून  
आजपर्यंत पाहिले आहेत. त्या समस्त व्यक्तिमत्वांना माझ्याकडून हि कविता 
सादर समर्पित. आपण देखील असे काही वेड स्वत:ला लावून घेता येते का पाहूयात.

Monday, February 25, 2013

ओवी - १

मी लिहिलेल्या "ओवी" आज माझ्या वेबसाईट वर प्रकाशित करत आहे. 
आपण सर्वांनी वाचाव्यात आणि आवडल्या तर तुमच्या मित्रांना वाचायला द्याव्यात; अशी विनंती.






Wednesday, February 6, 2013

बंदिश

"सवाई गंधर्व महोत्सव २०१२" मध्ये दिग्गजांचे गायन ऐकताना खालील "बंदिश" लिहिल्या होत्या.
आज प्रकाशित करत आहे. हा सवाई गंधर्वमधील सुरांचाच प्रभाव म्हणावा लागेल. 



Tuesday, February 5, 2013

हिंदी - भजन - माते सरस्वती



हे भजन "सवाई गंधर्व २०१२ महोत्सवामध्ये", गायन ऐकताना लिहिले होते. आज प्रकाशित करत आहे.
हि सवाई गंधर्वमधील वातावरणाचीच किमया म्हणावी लागेल 

LIKE Saarthbodh !!!