About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Friday, December 26, 2014

Wednesday, December 17, 2014

कविता - अकारण

पेशावर येथील १६ डिसेंबर २०१४ रोजी शाळेतील मुलांवर झालेल्या प्राणघातक अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध... 


Friday, December 5, 2014

आरती - श्री दत्त प्रभू

उद्या ६ डिसेंबर २०१४ - मार्गशीर्ष पौर्णिमा शके १९३६, श्री दत्तप्रभू जयंती. पौर्णिमा प्रदोषव्यापिनी व पूर्वविद्धा घेऊन आज म्हणजे ५ डिसेंबर रोजी देखील साजरी करतात.
श्री दत्त प्रभूंची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर आणि नृसिंहवाडी येथे आजच (५ डिसेंबर रोजी) दत्त जयंती साजरी होत आहे.
श्री दत्त महाराजांच्या चरणी माझी हि आरती समर्पित. 
ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll

श्री दत्त चरणरज,
सचिन पु. कुलकर्णी
www.saarthbodh.com




Tuesday, October 28, 2014

लेख - सफर जारी है …

मैं, मैं एक शख्स हूँ, इंसान हु मैं, एक जीव इस धरती पर जो किसलिए यहाँ आया, क्या करके जायेगा; ये खुद मुझे मालूम नहीं. यूँ तो सब जीते है, जिंदगी अपने अपने हिसाब से; अपने ऊपर आयी परिस्थितियोंसे लड़ते; झ़गडते; कभी मुस्कुराते; हसते; खुश होते; कभी मायूस होते. मैं इसी जिंदगीकी रास्ते पर चलने वाला एक मुसाफिर. मुझे न मंज़िल पता है ना; मेरी दिशा. रास्तो से दिशा लेके चलता हूँ मैं; रास्तोंपरही भटक जाता हूँ, दिशा वही कि वही रह जाती है, मैं वहाँ का वहाँ ठहर जाता हूँ, फिर वही सवाल; वही मंज़िल तलाशना; एक नया साहस, एक नया दौर, बीते रास्ते भूल कर मैं चलता हूँ; एक अनदेखी रौशनीकी ओर जिसे मैंने बस सुना है, महसूस भी नहीं किया. लोग जिसके खातिर तरसते है, मुझे भी उसे पाना है, कहते है ! वो ही मंज़िल है !,

रास्तो पर कई मुसाफिर मिलते है; कोई थके हुए, कई दौड़ते हुए, उस रौशनी कि झलक पाने के लिए बेताब, इन्सानोके समंदर में; इन्सानोकी लहेरे, एक दूसरे को झ़पटती, दूर करती; फिरसे पास आती. मैं कई बार इन मौजोंके बिच फसा हूँ; कभी कुछ कदम आगे गया हूँ; कभी किनारोंपे फेका गया हूँ, एक फिर से खड़ा होने कि उम्मीद; मैं फिर से उन्ही लहरोंपे बहने लगता हूँ, कोशिश क्या है? कि जो किनारा साथ है उसे छोड़ किसी दूसरी ओर और एक किनारा है; ये खुदको समझाकर उसी किनारे कि ओर खुदको दाव पे लगाते; आगे बढ़ने कि एक कोशिश. जिस किनारेपे है, वो किनारा क्यूँ नाज नहीं आया? इसका जवाब नहीं है मेरे पास, दूसरा किनारा कैसा है! देखाभी नहीं मैंने!, कोई उस ओर गया है ये सुना है मैंने, कभी किसीको वापस आया, और वहाँ का हाल बताते देखा नहीं है मैंने, फिर भी एक कशिश है; मुझे वहाँ जाना है, मेरे आसपास सभी उस एकहि मक्सद से लगे है, भला मै कैसे चुप रहूँ? क्या मुझे भी कभी लगा था! कि मैं, ये किनारा क्यूँ छोडू?

सोच रहा था मैं; उसी किनारे बैठ कर ढलते सूरज को देखते, मेरे साथ थी मेरी परछाई, ढलती शाम के साथ दूर होती परछाई को देख, फिर से दूर क्षितीज को देखने कि कोशिश करता, वही किनारे कि रेत पर मेरे निशान बनाता बैठ गया, कुछ देर बाद देखा परछाई; मेरी खुदकी परछाई; क्षितिज के वो पार जाता सूरज ले गया, कोई साथ नहीं यहाँ, कुछ लहेरोने बने बनाये निशान भी बहाकर मिटा दिए, फिर रह गया मैं अकेला, क्या सच है फिर?; क्या कायम है इस दुनिया में?, रात कि चादर पर अनगिनत तारे आये; चाँद आया, चैन से मैं देखता रहा, आँखोंमें नींद भरि और नजर में हसते तारे, मैं देखता रहा, एक ओर से सुबह सूरज चमका एक अनोखी चमक लेकर, मैंने देखा मेरी परछाई फिर साथ आयी; थोड़ी सहमी सहमी, मैं खुश हुवा; मुझे वापिस कुछ मिल गया, तब तक वो सुनहरा चाँद वो गीत गाते तारे गायब हो गए थे, कुछ देकर कुछ छिन लेती है जिंदगी, थककर मैं फिर किसी और जगह को ढूँढता हूँ; जहाँ कुछ न मिले सही; मगर कुछ खो न पाऊ.

मैं फिर मेरी मुसाफिरी कि फितरत में नए जोश से उसी पुरानी मंज़िल को ढूँढता आगे बढ़ता हूँ. कई तरीकेके लोग, जिंदगिया, चौराहे, गुमसुम सड़के, छोटी गलिया; मिलते; छोड़ते एक जगा रुकता हूँ. पीछे वही सुनसान दिशाए एक कदम मुझसे दूर दिखती, सामनेसे एक कदम नजदीक आती दिखती है. कभी बारिशमे भीगी रास्तोंपर पेड़ के सूखे पत्ते बहते हुए; दिशाहीन; पत्थरोंसे लीपटते, एक पल थमते; फिर बहते चलते है, कभी सुनी सख्त सड़क पर नम आँखोंसे मैं आगे चलता हूँ. सफ़र जारी रहता है, दिशा शायद बदल गयी है, मंज़िल वही है, बस उसे पाने कि देरी है. मेरा सफ़र जारी है. मैं दुनिया का एक मुसाफिर रोज नयी सिख लेते; कुछ अनुभव लेते, कुछ बाटते; अनुभवोंसे सार्थबोध लेते, चलता हूँ. सफ़र जारी है.

अब कुछ आसाद नजर आ रहे है, सफर के साथ बढ़ते उम्र के कदम कुछ सिखा रहे है. वो मंज़िल और रास्तोंका खेल अब नाकामसा लग रहा है, मुझे ये ऐसा क्यूँ लगता है? मालूम नहीं ! , दुनियामे बाहर कि भीड़, आज भी दौड़ रही है, मै अचानकसे थमसा गया हूँ !, मेरे अंदर शायद एक तूफान उठ रहा है, ये मंज़िले; रास्ते एक सपना लग रहे है, कोई मुझे अंदरसे आवाज दे रहा है, देख... सोच..., जब तुझे खुद का ज्ञान नहीं हुवा है, तूने खुदको नहीं पहचाना है, तू क्या ढूंढेगा अपनी मंज़िल को?.

आखिर मैं कौन हूँ?... ये विचार मेरे भीतर सैलाब ला रहा है. मुझे इस मौकेकी तो तलाश नहीं थी कही?, अब मुझे दिशाए, क्षितिज, आसमान साफसा दिखने लगा है, उसके पार भी कुछ है, शायद वही जगह; जहाँ से सब आते है, शायद वही हर एक कि मंज़िल है. क्या ये भी वहम है?, इतने दिन किसी एक विचारपर, एक लंबे दौर पर चला, किसीका साथ न था, आज कम से कम नया विचार; नयी दिशा तो मिली, थोड़ी अलगसी लगती है,

मैं फिर चल पड़ता हूँ; नयी दिशा; नए ख्वाब; नयी उम्मीद लेके. सफ़र जारी है. मैं खुदको तलाश रहा हूँ, जो कमसे कम मेरे साथ तो है, न अब रास्ता भटकनेका दर है; न दिशा गुम होने का भय है. मै तो मेरे साथ हूँ. मेरी खुद कि तलाश जारी है.

सफ़र जारी है...

-
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णीwww.saarthbodh.com 

Thursday, October 16, 2014

मनन/चिंतन - !!! ***शुभ दीपावली*** !!!

!!! ***शुभ दीपावली*** !!!

दिवाळी आली, सर्वत्र आनंद, उत्साह, प्रकाश, फराळ, नवीन कपडे, अत्तरांचा सुगंध, लक्ष्मीची पूजा, दुकानांतील गर्दी, खरेदी, नवीन वस्तूचे घरी येणे आणि एकूणच काय सगळा हर्षोल्हास.

माणसाने जसा काळ बदलत गेला तसा स्वत:मध्ये, वागण्यात, विचारात विलक्षण आणि साजेसा बदल केला, कालानुरूप जगण्याची हीच व्यापक व्याख्या असावी. पण काही गोष्टीत अजून बदल व्हायला हवा असे माझे वैयक्तिक मत आहे, आग्रह नाही.

आपण बरेच जण शहरी भागात राहतो, रोजचे कामावर येणे-जाणे, गर्दी, धूर, प्रदूषण, गोंगाट याने ग्रासलेलो असतो, कधी घरात जाऊन, पंखा लावून शांत बसतो असे वाटते. याला कारण गाड्यांची बेसुमार वर्दळ, त्यातून जीव गुदमरवणारा धुराचा कोंडमारा, अशात आपण दिवाळीत फटाके उडवतो, फटाक्यांनी पुन्हा आहे त्या धुरात भर घालतो, त्यांच्या आवाजाने निसर्गात लहान-सहान जे काही पक्षी शिल्लक राहिले आहेत ते भेदरतात, फटाके फुटून होणारा कचरा वेगळाच. त्यात पण लक्ष्मी पूजनाला, लक्ष्मीचे चित्र असलेले फटाके फोडून त्या चित्राच्या चिंध्या होऊन पायाखाली तुडविले जाणे म्हणजे किती विरोधाभास?

मला असे वाटते फटाके उडवण्यावर थोडा प्रतिबंध आपण स्वत:ला घातला पाहिजे, आवाजी फटाके उडविण्यात तर काही अर्थच नाही, रोषणाईचे फटाके पण एका मर्यादेपर्यंत उडवायला हवेत. जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम, यापासून आपण स्वत:ला/ पुढच्या पिढीला सावध केले पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या संकेतातून काही सार्थबोध घ्यायला हवा.

तसेच "मेड इन चायनाचे" आकाश दिवे, दिव्यांच्या माळा, फटाके, मेणाच्या पणत्या, विकत न घेता, अशा उद्धट आणि घुसखोरी करणाऱ्या शेजारी देशाला चांगला धडा शिकवला पाहिजे.

फटाक्याचा खर्च वाचवून आपण कुणा गरजू माणसला मदत करू शकतो का? जसे कि एखाद्या वृद्धाश्रमात किंवा वनवासी कल्याण आश्रम शाळेत जाऊन तिथल्या नागरिकांना/ विद्यार्थ्यांना खाऊ वाटणे, अथवा सामाईक उपयोगाची वस्तू उदा. पाणी शुद्ध करायचा फिल्टर, सिएफ़ेलचे दिवे, सायकल, किराणाच्या वस्तू, येणाऱ्या थंडीसाठी लोकरीचे कपडे, हातमोजे, कानटोप्या, चादरी, किंवा सहसा लागणारी औषधे घेऊन देणे, अशा काही वस्तू आपण अथवा आपल्या मित्र-मैत्रिणी अथवा इमारतीमधील सभासद यांना जमवून, मदत गोळा करून देऊ शकतो का?, त्यांच्याशी गप्पा मारून, त्यांच्यात मिसळून त्यांचा आनंद वाढवू शकतो का?  
फारच साधी गोष्ट आहे, जर आपण हि मदत देऊ केली तर समाजातील या घटकांना देखील आनंद होईल व आपणही समाजातील दुर्लक्षित घटक नाही या जाणीवेने त्यांना आनंद होईल व त्यांचीही दिवाळी आनंदाने सजून उजळून जाईल. आपणास हा विचार पटल्यास नक्कीच इतरांना सांगा.

आपणा सर्वांना माझ्याकडून हि दिवाळी आनंदाची, सौख्याची, निरोगी, देशभक्तीची आणि भरभराटीची होवो अशा मन:पूर्वक शुभेच्छा !!!

- © सचिन पु. कुलकर्णी

Tuesday, October 14, 2014

कविता - अन्नदान

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात नित्य अन्नदान होत असते, मी काही दिवसापूर्वी एकदा अन्नदान सेवा केली होती त्यावेळचे मनातील विचार.

ll श्री स्वामी समर्थ ll





Monday, September 8, 2014

अक्षरबद्ध कविता - आशा भोसले

आज ८ सप्टेंबर, आशा ताईंचा वाढदिवस, आशा ताईंना माझ्याकडून, हि अक्षरबद्ध कविता समर्पित...






Friday, August 22, 2014

कविता - ओला / सुका

कुठे अति पावसाने पूर येत आहे, तर कुठे जमीन कोरडी पडून पिक करपून जात आहे. दोन्ही परिस्थितीत शेतकऱ्याचे हाल होत आहेतप्रसंगी गाव; घर सोडून त्याला दुसरीकडे आश्रय घ्यावा लागत आहे.
पुन्हा नवीन; अनोळखी जागी कष्ट आणि नवे प्रयत्न. त्याच्या मनातील व्यथा मांडण्याचा एक प्रयत्न.



Thursday, July 31, 2014

आवाहन - माळीण दुर्घटना

"वनवासी कल्याण आश्रम" या संस्थेतर्फे आम्ही कपडे, स्वयंपाकाची भांडी, औषधे, तंबू, तयार-टिकाऊ खायचे पदार्थ अशा वस्तू लोकांकडून गोळा करून दुर्घटनास्थळी पोचत्या केल्या. वैद्य आणि औषधे घेऊन एक रुग्णवाहिका रोज पाठवण्यात येत होती. आश्रमाच्या स्वयंसेवकांनी मृत देहांचे अंत्यसंस्कार केले. निधी संकलन करायचे काम अजूनही चालू आहे, आणि त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ईश्वर मृतात्म्यांना सद्गती देवो ! 

Thursday, July 17, 2014

कविता - मुंबई

हि कविता सर्व मुंबई प्रेमींना समर्पित ...
 
 

Wednesday, July 2, 2014

मनन/चिंतन - पाऊस - वनराई


फार प्रतीक्षा करायला लावून शेवटी जीवनदायी पाऊस आलापरमेश्वराचे आभार !!!.

पाऊस उशिरा का येतोय?, अवेळी, कमी-जास्त का पडतोय?. कारण एकच  वनराई - झाडे कमी होत आहेत, चला जमेल तितकी झाडे लावूया आणि महत्वाचे म्हणजे ती जगवूया. हा संदेश या वर्षीच्या पहिल्या पावसाचा चिंब आनंद घेत सगळ्यांना देऊया. मोकळ्या जागेत, टेकडीवर झाडे लावूया. टिकणारी झाडे जशी कडुलिंब, पिंपळ लावूया.  पक्षांना खायला मिळेल अशी वड - औदुंबर, चेरीची झाडे लावूयात आणि निसर्ग वृद्धिंगत होण्यात किमान तरी हातभार लावूयात.

आता पावसाळ्यात आपले मित्र-मैत्रीण ट्रेकला जातात, त्यांना सोबत अशी झाडे-बिया न्यायला सुचवुया.  कचरा/ प्लास्टिक टाकून डोंगर/किल्ला खराब करू नये असाही संदेश देऊया. डोंगरावर झाडे लावून सावली मिळेल, मध्यात झाडे लावली कि डोंगर काही वर्षांनी हिरवागार दिसायला लागेल, वरून झाडांचे बी पडून/ वाहून येउन इतर भागही काहीसा रमणीय होईल. चला हा संदेश सगळ्यांपर्यंत पोचवुया आणि पावसाळा/थंडी आहे तोवर पुढचा उन्हाळा येई पर्यंत चर्चा आणि कृती करत राहूयाहा विषय आपल्या परीने तडीस नेउया .

या संदर्भाने मी केलेल्या एका ट्रेकचा उल्लेख इथे वाचा. 

लेख:- गडकोट किल्ले एक सांस्कृतिक ठेवा:-
 
 
माझ्या इतर काही, पाऊस आणि पावसासाठीच्या कविता-
 
ये बरसून -   http://www.saarthbodh.com/2012/07/blog-post.html

आस्वाद-    http://www.saarthbodh.com/2013/06/blog-post_10.html

पाऊस निसर्गाचा-    http://www.saarthbodh.com/2012/07/blog-post_19.html

 
-sachin P. Kulkarni
www.saarthbodh.com

Monday, June 30, 2014

प्रसंग - नळ दुरुस्ती


नवीन ठिकाणी राहायला आलो होतो, नेहमीची आवरा-आवरी, केर काढणे, वस्तू जागेवर लावणे, दुध , वर्तमानपत्र वाल्याची चौकशी करणे अशी कामे करत होतो. हात-पाय  धुवायला गेलो तर नळ गच्च बसला होता, आता पंचाईत झाली. बाजूला फरशीपासून कमी उंचीवर छोटा नळ होता; तात्पुरते काम भागले, पण मुख्य नळ दुरुस्त करणे गरजेचे होते. अंधार पडायला लागला होता, बाहेर पडलो सुरक्षा रक्षकाकडून नळ दुरुस्त करणाऱ्या प्लंबरचा मोबाईल क्रमांक घेतला ; त्याचे नाव नंदू. कल्पना नव्हती मला… असा विलक्षण संवाद झाला… वेळ संध्याकाळी ७ ची .

मी- फोन केला पूर्ण वेळ रिंग वाजली पलीकडून फोन उचलला नाही, अशा वेळी आपण जरा जास्तच उतावीळ आणि  अस्वस्थ होतो, क्षणाचा विलंब न करता परत फोन केला …( पलीकडून फोन उचलला .
(www.saarthbodh.com)

नंदू- ह SS ह ख SSख घशात आवाज काढत … मंद्या किती वेळ वाट बघतोय … कुठायस …असा प्रश्न झाला , मी गोंधळलो …अहो मी मंद्या नाही . सचिन बोलतोय, तुमचा नंबर त्या सिक्युरिटी वाल्या विकास कडून घेतला … आता पलीकडे एकदम शांतता झाली. नंदू म्हणाला साला मिष्टेक झाली काय साहेब? मला; तो विचारतोय कि सांगतोय हेच कळेना. असो. मी म्हणालो अहो माझ्या घरातला एक नळ दुरुस्त करायचा आहे, मी नवीन राहायला आलो आहे नंदन गार्डन मध्ये तुम्ही कराल का? नंदू म्हणाला, अहो नळ दुरुस्त करायचा तर एकांदा पलंबर गाठा ना  राव, मला कशाला फोन केला? या वक्ताला !!!. मी चपापलो. म्हणालो आपल्याला सिक्युरिटी ने गंडवला का काय !!!. ओके ओके. मला त्या विकास ने नंबर दिला हो. नंदू म्हणाला आओ ! विकास उद्या माझा नंबर डॉक्टरचा म्हणून देईल. तुम्ही काय तब्येत दाखवायला याल का मला, काय पण राव विंटेलीजंट माणूस, न बघता फोन करता … मी- सॉरी तुम्हाला त्रास दिला. फोन कट. (www.saarthbodh.com)

म्हणलो आता जाऊन त्या सिक्युरिटी वर कट काढू. मी बाहेर जेवलो, एक दोन वस्तू घेऊन परत चाललो , तेवढ्यात मला नंदूच्या फोन वरून फोन आला, मनात म्हणले आता काय त्रास आहे यार याचा. फोन उचलला. पुन्हा घशातली खर खर ऐकू आली. साह्येब मगाशी मिष्टेक झाली काय!!. साला परत तेच… विचारतोय का सांगतोय हेच  कळेना. मी म्हणालो अहो सॉरी तुम्हाला चुकून फोन केल. तो म्हणाला तुम्ही नाही सॉरी … म्या सॉरी. मी नंदू पलंबर बोलतोय. मी म्हणालो अहो मग मगाशी नाही का म्हणाला? ते काय मगाशी माझ्या भावाने फोन उचलला. एकंदरीत आवाज ऐकून पलीकडे तार छेडली गेली आहे, हे मी ओळखले, एव्हाना ८ वाजून गेले होते. नंदू बोलला भावाने फोन घेतला हो, बोला काय काम आहे. मी म्हणलो अहो आवाज तर हाच होता, नंदू बोलला जुळे…  आम्ही दोघे जुळे आहोत, (दोन घोट पोटात गेले कि जास्त चांगल्या कारणे/कल्पना माणसाला सुचत असव्यात) म्हणून तसे वाटले असेल तुम्हाला. मगाशी मंद्या आला नव्हता आणि खेळ सुरु झाला नव्हता आणि आता घसा ओला झाल्यामुळे सगळी लिंक लागली आहे, हे माझ्या लक्षात एव्हाना आलेच होते. (www.saarthbodh.com)

हम्म म्हणालो… चला ठीक आहे. , नंदू - बोला साहेब काय काम आहे. मी म्हणलो नळ बसवायचा आहे. नंदू - ओके बसवला आणि काय काम आहे. मी म्हणलो अहो बघायला लागेल ना आधी, नंदू - ओके बघितला; पुढे ? मी -अहो कसला नळ आहे ठरवायला नको का?, नंदू -ओके ठरवला , आणि काय काम? मी - अहो नंदू शेठ … (त्याच्या या तत्पर उत्तरांना कंटाळून मी त्याचा शेठ केला होता). अहो मला सांगा पैसे किती ? तो बोलला ६५ , असली आड-नीड किंमत ऐकून मी वेडा झालो. अहो पण नवा नळ लावायचा असेल तर, तो म्हणे १६५. आणि पाईप खराब असेल तर, तो म्हणे २६५. मी म्हणलो अरे हे दर वेळी ६५ काय आहे? तो म्हणाला साहेब आमची चपटी संत्रा ६५ ला येते, उरलेले कामाचे पैसे. मी म्हणलो अरे !! दारू का पिता?, फळाचा ज्यूस वगैरे प्या. नंदू बोलला, मग संत्र काय आहे?, फळच आहे ना... काय मजाक करता काय गरीबाची !!! साहेब. मी काय समजायचे ते समजलो, उद्या या ... मग बोलू ... असे म्हणून फोन ठेवला.
 
© सचिन पु. कुलकर्णी
www.saarthbodh.com
FB ID - sachin.kulkarni78

Monday, June 16, 2014

भावगीत - मोरपीस

मी प्राथमिक चाल लावलेले माझे अजून एक भावगीत… लवकरच संगीतबद्ध होत आहे...


Thursday, May 22, 2014

भावगीत - स्पंदन


मी लिहिलेले आणि प्राथमिक चाल लावलेले हे माझे खूप आवडते भावगीत. इथे फक्त शब्द मांडत आहे.



Thursday, February 27, 2014

कविता - ll माय मराठी ll

आज २७ फेब्रुवारी - मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


Saturday, January 25, 2014

कविता - प्रजासत्ताक दिन

उद्या २६ जानेवारी २०१४ - प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


LIKE Saarthbodh !!!