ll भजन ll - ध्याईले श्रीगुरु चरण
ll भजन ll
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
ध्याईले श्रीगुरु चरण
करीले नाम तयाचे स्मरण
भाग्याचा आला असे क्षण
होउया दंग आता सर्वजण ll १ ll
झाली ही दशा दारुण
कोण करील तयाचे हरण
मी म्हणतो भजन गण गण
घेतले असे नामाचे वाण ll २ ll
बरसले दैन्यरूपी बाण
भासले जवळ हे मरण
करील कोण अमुचे संरक्षण
बरसूदे कृपा जशी तो वरुण ll ३ ll
जीवन हे भासे अरण
करितो धेनुरूप हंबरण
तुम्हीच करा सर्व कष्ट तारण
करा हो तया कृपेची पेरण ll ४ ll
आता कंठाशी आला प्राण
रूप तुझे हृदयात कोंदण
राम नसे जगी तुझ्यावीण
करितो नाम तुझे संस्मरण ll ५ ll
जनहो समजा हा सण
करा सदा नाम गुरुचे श्रवण
फिटेल हो जन्माचे पारण
वर्षूदे कृपारुपी हे कण ll ६ ll
होऊया सर्व तयार आपण
चेतवू आपुले दोन्ही कर्ण
विसरुया आपसातले वर्ण
होऊ जसे मिष्टान्न सारण ll ७ ll
करुया गुरुनामाचा पण
मिळाले प्रभुकृपेचे आंदण
करुया जीवनाचे विवरण
होउया गुरुनामी रममाण ll ८ ll
होईल कृपावंत लक्ष्मीरमण
उमजेल जन्माचे कारण
सर्व फीटून जाईल ताण
भजा हो श्रीगुरूचे चरण ll ९ ll
समर्थ कृपाभीलाषी,
सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment