चारोळी - मकर संक्रांती
रोजचे लोक...रोजचे आयुष्य...रोजचाच बोलबाला
कोणी म्हणते जरा मन मोकळे करा...जरा बोला
कोणी म्हणते...अरे! हा भेटला...किती बोलला
कोणी सूज्ञ सांगे सदा...कमी बोला ...कमी बोला
कोण काय म्हणते... आज तूर्तास ठेवा बाजूला
आज मकर संक्रांती ...तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला !!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
- सचिन पु कुलकर्णी
Comments
Post a Comment