कविता - वेळ.......त्याच्याविना,.......त्याच्यासवे

कुण्या एकीचा सखा-जोडीदार दूर गावी गेला, लवकर परत यायचा त्याने शब्द दिला होता, त्याला येणे न जमल्यामुळे, तिचा जो विरह झाला त्या दिवशीची सकाळ, संध्याकाळ आणि रात्र तिला फार वेगळी वाटली, पण दुसऱ्याच दिवशी तिचा आयुष्याचा जोडीदार परत आला असताना तिला तीच सकाळ, संध्याकाळ आणि रात्र कशी वाटली याचे हे वर्णन.
-----------------------------------------------------------------------------------------------------
गेला तो दूरगावी, मी डोळे वाटेस लावूनी
शब्द येण्याचा होता ठरला, जो केवळ शब्दच राहिला
 
सांजसंध्या अंधारली, किडे पाखरे किरकीरली
संध्याही कोमेजून गेली, मी फक्त वाट पाहिली
 
रात्र घनघोर काळोखली , तिमिर भरून चितारली
आसवे दाटून आली, रात्रीतही मी फक्त वाट पाहिली
 
दिवस भकास उजाडला, कालचा विसर नाही पडला
करता काम जरी मी, वाटेकडे नजर लागली....... मी फक्त वाट पाहिली
 
पुढचा दिवस, पुन्हा संध्याकाळ आली, आणि गावावरून तो परतून आला,
 
मी डोळे वाटेस लावलेले, त्याचे पाऊल दूर पडलेले
संकेत मला समजलेले, मी धावत उंबऱ्यात होते
 
सांजसंध्या अवतरली, मनमोहक मोहरली
त्याच्यासावे कितीक प्रहर, मी सुखसागरात हरपली
 
रात्र सुंदर अंबरली , आज कसलीच उणीव न उरली
त्याच्या मिठीत अशी काही, माझी रात्र मंतरली
 
दिवस दिव्य उजाडला, तिमिर सारून प्रकाशला
मनी रात्रीचा आठव, माझी साथ सोबत त्याला
 
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Comments

  1. :) nice ... shaped up the picture in mind as I read it !
    -abhay chaware

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts