भावगीत - मी तिला असेच पाहिलेले.......
पेमाच्या व्याख्या वगैरे फार किचकट विषय आहे आणि त्यात पडण्यापेक्षा; जे प्रेमात पडतात; त्यांची दुनिया; त्यांचा ढंग, त्यांचे ते दिवस याची धुंदी काही न्यारीच असते.
असेच कुणी, कुणाला; कुठेतरी; एकदा पाहिलेले असते, काहीतरी होते आणि न बोलता एक नाते जुळायला सुरुवात होते.
कुणी तो/ती बोलायला घाबरत असतात, किंवा एखादा तो/ती; त्याच्या/तिच्या बोलण्याची वाट पाहत असतात.
अशाच एका कोणाची; कुणाला तरी पाहून; तरीही अजून व्यक्त न केलेली भावना..........
प्रेमावर निष्ठा ठेवून सगळ्या जगाला झुगारून देऊन; जे लोक पुढे आयुष्यात; सतत आपल्या जोडीदाराबरोबर राहतात; आणि यशस्वी संसार करतात त्यांना माझा सलाम.
कविता खास माझ्या भावाकरिता समर्पित.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
मी तिला, असेच पाहिलेले
छबीस त्या, मनी कोरलेले
क्षण माझेच मी, हळुवार चोरलेले
फुरसतीत ते, उलगडुनी पाहिलेले
कटाक्ष तुझा, शितलेप चंदनाचा
पाहणे जसे, हाय SS... खेळ श्रावणाचा
पाऊले पडून, शिडकाव चांदण्यांचा
जीवघेणा प्रकार, वेध काळजाचा
आठवण तुझी, हृदयात जागलेली
झंकारते अजून, वीणा तू छेडलेली
नयनात तुझी, आकृती तोललेली
पुन्हा वळून, नजरेत चोरलेली
दिस गेले अनेक, युग कितीक भासे
तुला एकवार, आस पाहण्याची असे
ठाऊक ना रात, आज जाईल कैसी
मृगजळ मृगास, तिष्ठवी बात तैसी
झाले जरी, उद्या तुला पहाणे
बोलेन की, तैसेच मनी रहाणे
केले कितीक, बोलण्याचे मी बहाणे
विस्मरतो; राहती, मनात प्रेम तरा णे
© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Comments
Post a Comment