मनन/चिंतन - पाऊस - वनराई
फार प्रतीक्षा करायला लावून
शेवटी जीवनदायी पाऊस
आला … परमेश्वराचे आभार
!!!.
पाऊस उशिरा का येतोय?,
अवेळी, कमी-जास्त
का पडतोय?. कारण
एकच… वनराई
- झाडे कमी होत
आहेत, चला जमेल
तितकी झाडे लावूया
आणि महत्वाचे म्हणजे
ती जगवूया. हा
संदेश या वर्षीच्या
पहिल्या पावसाचा चिंब आनंद
घेत सगळ्यांना देऊया.
मोकळ्या जागेत, टेकडीवर झाडे
लावूया. टिकणारी झाडे जशी
कडुलिंब, पिंपळ लावूया. पक्षांना खायला मिळेल
अशी वड - औदुंबर,
चेरीची झाडे लावूयात
आणि निसर्ग वृद्धिंगत
होण्यात किमान तरी हातभार
लावूयात.
आता पावसाळ्यात आपले मित्र-मैत्रीण ट्रेकला जातात,
त्यांना सोबत अशी
झाडे-बिया न्यायला
सुचवुया. कचरा/
प्लास्टिक टाकून डोंगर/किल्ला
खराब करू नये
असाही संदेश देऊया.
डोंगरावर झाडे लावून
सावली मिळेल, मध्यात
झाडे लावली कि
डोंगर काही वर्षांनी
हिरवागार दिसायला लागेल, वरून
झाडांचे बी पडून/
वाहून येउन इतर
भागही काहीसा रमणीय
होईल. चला हा
संदेश सगळ्यांपर्यंत पोचवुया
आणि पावसाळा/थंडी
आहे तोवर पुढचा
उन्हाळा येई पर्यंत
चर्चा आणि कृती
करत राहूया … हा
विषय आपल्या परीने
तडीस नेउया .
या संदर्भाने मी केलेल्या
एका ट्रेकचा उल्लेख
इथे वाचा.
लेख:- गडकोट किल्ले एक
सांस्कृतिक ठेवा:-
माझ्या इतर काही, पाऊस आणि पावसासाठीच्या कविता-
आस्वाद- http://www.saarthbodh.com/2013/06/blog-post_10.html
पाऊस निसर्गाचा- http://www.saarthbodh.com/2012/07/blog-post_19.html
-sachin P. Kulkarni
www.saarthbodh.com
Comments
Post a Comment