ll भजन ll - काय ठावे मर्म कुठले
काय ठावे मर्म कुठले
बालपणी न काही कळले
तरुणपणी कळूनी न वळले
वृद्धपणी अवयव थकले
काय ठावे मर्म कुठले ll १ ll
वय झाले वर साठ
आयुष्य जाणवे रिक्त माठ
काही न गवसले ठेवूनी आस
भेटेल का कोणी गुरु खास ll २ ll
बोल सांगतो ध्यानी घ्यावा
हर एक समयी कर्म साधावा
वेळ मिळेल म्हणुनी वाट न पाहावा
नित्यनेमी गुरु आठवावा ll ३ ll
वेळ दवडीला बहु काळी
रिक्त जाहली अवघी झोळी
वेळ वाटते आली जवळी
भेटेल गुरु देईल नवी झळाळी ll ४ ll
समर्थ कृपाभीलाषी,
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com
Comments
Post a Comment