भजन:- ll श्रीराम कवण ll
ll श्रीराम कवण ll
जिथे प्रभू श्रीराम, तेच आमुचे चार धाम
घेत नाही त्यांचे नाम, तोवरी नाही विश्राम
जैसे श्री हनुमंत, तैसे होऊ दे आमुचे नाम
तोवरी आहे एकच काम, म्हणा जय श्रीराम, जय श्रीराम !!!
कलियुगी हा जन्म आमुचा, आम्ही अहो बहु अजाण
जोवरी आहे अंगी त्राण, चरणी तुमच्या आमुचा प्राण
सर्व दु:खांना "जय श्रीराम", हाची उपाय रामबाण
जीवनाचे फलित मोजाया, रामनाम हेची प्रमाण !!!
तुमच्या भेटीचा धरिला ध्यास
तुमच्या कृपेचा साधतो प्रयास
करितो स्मरण तुमचे अनेक मास
काही अंशी बनवा आम्हासही रामदास !!!
आम्ही जगतो जसे प्राणी वन्य
आम्हास कुठली कृपा होणे नाही अन्य
"जय श्रीराम" हाची एक मंत्र आहे मान्य
बोला "जय श्रीराम" होवू धन्य धन्य !!!
ll श्री रामदास स्वामी स्मरण जय जय राम ll
ll श्री हनुमंत हृदय स्मरण जय जय राम ll
ll बंधू लक्ष्मण जीवन स्मरण जय जय राम ll
ll बंधू भरत श्रद्धा स्मरण जय जय राम ll
ll बंधू शत्रुघ्न भक्ती स्मरण जय जय राम ll
ll सीताकांत स्मरण जय जय राम ll
ll श्री दशरथ कौसाल्यात्मज पुण्यस्मरण जय जय राम ll
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment