गीत - कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
मराठी चित्रपट सृष्टीतला हुकुमी एक्का, मराठी चित्रपट सृष्टीची चाल मंदावली असताना मरगळ झटकून थेट अवकाशाला यशाची गवसणी घालणारा,
एकप्रकारे यशाची दादागिरीच करणाऱ्या शाहीर दादा कोंडके (कृष्णा) यांचा गोकुळाष्टमी तिथीदिवशी जन्म झाला होता. नुकत्याच झालेल्या गोकुळाष्टमिनिमित्त त्यांना माझ्याकडून हे गाणे एक विनम्र आदरांजली.
लहान तोंडी मोठा घास- दादांच्या शैलीत लिहायचा प्रयत्न केला आहे, गाणे बरे झाले तर दादांचा आशीर्वाद आणि सपशेल काही चुकले तर माझ्या तोकड्या बुद्धीप्रमाणे लिहिले असे समजून माफी असावी.
---------------------------------------------------------------
माझ्या मनात तू, चांदणं फुलवावं गं
तुझ्या हृदयात मी, जीवाला भुलवावं
कस्स अपुन, दोघांनी प्रेम फुलवावं
कुठ मिळतोय का, भेटायला थोडा वावं
कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
तुला पाहून, माझ्या काळजानं सोडलाय ठावं
अस्सा घातलायं, तुझ्या नजरेनं हृदयात घावं
तू लावशील का, तुझ्या नावापुढं माझ नावं
मग जमवुया, दोघ लग्नाचा झक्कास डावं
लगीन कराव्वं.......आहा.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
काय सुधरना, तुला कुठं कुठं फिरवावं
अस्स जोडीन, बाजाराला बी न्यावं
कस्स हृदयात, गोंदून तुला बसवावं
डोळं मीट्टून, सप्न तसच जपून ठीव्वावं
सप्न खुलवावं.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
तुल्ला हाताच्या, झोपाळ्यामधी झुलवावं
तुझ रूप तू, ऐन्यामधी गं खुलवावं
घालून हातात हात, बागेमंदी बसावं
तुझ्या वेणीत, गुलाब फुल माळावं
अस्सं फिर्रावं.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
सुख्खी संसारी या, गोडीन दोन घास खावं
एक तू; एक मी, मला तुला भरवावं
मन मिसळावं, जस्सं दुधात केशर पडावं
संभूपार्वती, रामशितावानी अपुन राहावं
अस्सं राहावं.......कस्स फुलवावं.......प्रेम अपुन दोघांनी फुलवावं
© सचिन पु. कुलकर्णी
Comments
Post a Comment