फटका - ध्यानी एक भाव, वाचे असे दुजा भाव
ध्यानी एक भाव, वाचे असे दुजा भाव
कसा पावे स्वामीराव....... अशाने; कसा पावे स्वामीराव
वाचे बोली स्त्री ही माता, वाटेमध्ये पाही जाता जाता
सुटे नजर न त्याची, मान शोधे ललना फिरता
बोले पैसा अडका खरा, परी कष्टाने कमवावा
काही संधी दिसता बेटा , पार लुबाडनी गेला
बोले देव मनात असावा, कशाला यात्रा धर्म करावा
वेळ येता बिकटीची, बाता सोडी करी धावा
वेळ येता बिकटीची, बाता सोडी करी धावा
बोले संकटे येवो लाख, आपण असावे जिद्दीने ताठ
खरे संकट समयी, हा पळे दाखवुनी पाठ
बोले काम करीत जावे, अपेक्षा फळ धरू नये
काडीचे काम करुनीया, बोले का फळ मिळू नये?
सदा बोले सगळ्यांना, नको बाता फुक्या मारू
भेटता कोणी याला कधी, बाता फुशारक्या मारी
बोले सदा चिंतन चांगले, करावे लोकांचे मनाने
कुणाची कळता वार्ता भली, याला जळजळ विचाराने
आपले काम करी म्हणे, नको दुसऱ्यात लक्ष
सदा दुसऱ्यावरी नजर, हेच काम असे त्यात दक्ष
असा लबाड हा भारी, याला ऐन समयी कोण तारी
लोकहो मनी जो असे भाव, तोची राहो जगण्याचा ठाव
जे बोलाल ते कराल, तर तुमची नौका तरेल
असे एकची मनी भाव, तर नक्की पावे स्वामीराव
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment