भजन - हरीभक्त आम्ही, हरीनाम जागर जागर


हरीभक्त आम्ही, हरीनाम जागर जागर
मार्ग कितीक मोक्षाचे, परी भक्तिमार्ग सुकर

काम धाम कष्ट सारे, आटापिटा पोटासाठी
आम्ही स्वार्थी जन ,जग चालवी तो जगजेठी

संसारात किती केले, परी शेवटी काही न उरे
जन्म-मृत्यू दोन टोके, जुळविता देह नुरे

ज्याचा शेवट माहित होता, त्याच्या आरंभी लागलो
निम्मे सरता; सारे कळता, देवाजीच्या पायी लागलो

सत्य पचवा सावकाश, जन्म मातीत शेवट मातीस
उपाधी कमविली कितीक, शेवटी राख हीच उपमा त्यास

जन्म माणसाचा घेतला, केला बहुत ऐसा साजरा
नरजन्मी कमवून काही, चुकव चौऱ्याऐंशीचा फेरा

नित्य कर्म चालू असो द्या, त्यात नका पाडू अंतर
राहो मनी भाव तयाचा, नाम हरीचे जपा निरंतर

© सचिन पु. कुलकर्णी
sachin.kulkarni78@gmail.com

Comments

Post a Comment

Popular Posts