कविता - आता अजूनही मी, त्यास दान मागताहे
माणूस जन्माला आल्यापासून काही ना काहीतरी सतत देवाकडे मागत असतो. त्याच्या लहानपणी त्याला बोलता येत नसते, काही समजत नसते तेंव्हा त्याचे घरचे लोक त्याच्याकरिता देवाकडे काहीबाही मागत असतात. थोडक्यात एक सवय अशी लागते कि देव हा हट्ट करण्याकरताच बनला आहे अशी भावना होते .त्यावर लिहिलेली हि कविता.
------------------------------------------------------
आता अजूनही मी, त्यास दान मागताहे
ते माझेच लोक होते, याचना माझ्याचसाठी
------------------------------------------------------
झाली कितीक वर्षे, मी याचक बनून आहे
स्मरतात त्या दिसांचे, भलेबुरे क्षण पुराणे
न होती मला प्रतिभा, केवळ दिखावे पहाणे
परमेश्वरास बोलती कि, दे यास चीज खास काही
होऊन आज मोठा, ती आदत जखडून आहे
स्मरती जुन्या कितीत्या, मागोव्यातील लाख इच्छा
पुरल्या अनेक त्यातील, आज बोली नवीन आहे
लागले व्यसन फुकाचे, देवावरी हक्क थोपलाहे
त्यास सुटका तिथून नाही, मी घरात कोंडलाहे
त्यास सुटका तिथून नाही, मी घरात कोंडलाहे
देवही भला बिचारा, पुरवी लळे वाकुडे ते
त्यास माहित असावे कदाचित, मज जन्म याचकाचा आहे
"dev hatta karaNyaa-saathich banala aahe" ... this is really great thought .. very nice read ... kp writing ...
ReplyDelete