ll भजन ll - मनुष्य जन्माचा आधारू – गुरु


ll भजन ll


मनुष्य जन्माचा आधारू 
गुरु भासे कल्पतरू
नेत्र शोधोनी उरले पुरू
कोठे मला भेटेल गुरु                     ll १ ll

एक एक जन्म लागले सरू
हरेक जन्मात काय करू
मनुष्य जन्माचा अर्थ कोणा विचरू
कोठे मला भेटेल गुरु                     ll २ ll 

जरी गुरु शोध झालीया सुरु
क्रियमाण हाती फळ देईना उरू
वर्णिता गुरु थकेल बोरू
हात टेकले; भेटेल का गुरु                 ll ll  

मनीचे माझ्या अवखळ वारू
कोण शकेल त्या सावरू
जीवाचा कोलाहल मी न शके आवरू
कोठे मला भेटेल गुरु                      ll ४ ll  

गुरु ज्ञानाचा सागरू
रूप तयाचे अगोचरू
गुरु जीवन मार्गीचा पांथारू
शोधीतच आहे परी मिळेना गुरु              ll ll 


आयुष्य लागले आहे सरू
नाही आठवीला आधी गुरु
कशी उणीव ती काढून भरू
साधून घेऊ या अवसरु
कधी भेटेल मला गुरु                     ll ६ ll  

श्री गुरु चरणरज,

 © सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Comments

Popular Posts