ll भजन ll - गुरु माउली, पाही माम, पाही माम, पाही माम
ll भजन ll
गुरु माउली, पाही माम, पाही माम, पाही माम
गुरु माउली, पाही माम, पाही माम, पाही माम
पाही माम, पाही माम, पाही माम ,
गुरु माऊली, त्राही माम, त्राही माम, त्राही माम
काळ आपल्या निश्चयी ठाम
काहीच घडेना अमुचे काम ll १ ll
एक एक संपविता दैन्य
झडपे नवे जसे घेउनी सैन्य
उरलो एकटा नुरली शक्ती
टीकुनी आहे तरी मम भक्ती ll २ ll
आता साहवेना प्रखर हा भोग
भोग म्हणू कि घोर कलीयोग
तुझ्या कृपेचा येईल योग
तेवीच सुटे हा पापाचा रोग ll ३ ll
धाव धाव हे प्रभो आता
प्राण कंठाशी आला आता
नको जाऊ देवू माझा जन्म वृथा
तुझ्या चरणी ठेवितो माथा ll ४ ll
शरीरी प्राण आहे जोवरी
श्रद्धा नाही ढळणार तोवरी
परी अंत नको पाहू श्रीहरी
धाव आता ये झडकरी ll ५ ll
समर्थ कृपाभिलाषी,
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
Comments
Post a Comment