ll भजन ll - गुरु तोच आहे, गुरु तोच आहे
ll भजन ll
गुरु तोच आहे, गुरु तोच आहे
गुरु तोच आहे, गुरु तोच आहे
गुरु तोच आहे गुरु तोच आहे
कुठेही दिसेना तरी मूर्तरूप आहे
आजवरी दर्शन नसेल झाले जरीही
तुझे रूप माझ्या मनी पाहतो मी ll १ ll
तुज कल्पू शकेना मी वर्णू शकेना
परिमल तुझ्याभेटीचा मनी समाईना
तूच एकमेव वैकुंठी गेलासी सदेही
तुझी नीती चालवू अशी माझी ग्वाही
तूच वदविला असे एक रेडा
आजही लीहविला तूच हा वेडा ll २ ll
तूच शंतनू तूच नरहरी
कृपा करी रे मजवरी लवकरी
तूच हृषीकेश तू माझे वैभव
भेटीचा संकेत द्यावा हीच माझी हाव ll ३ ll
तुझ्या येण्याने वाहतो धुंद हा समीर
श्रीकृपा वर्धनास असे मी अधीर
तूच माझे भूषण तूच प्रकाशमय
तूच लक्ष्मीकांत देई मज अभय ll ४ ll
हे श्रीरामा माधवा पुरुषोत्तमा
हे श्रीपाद श्रीवल्लभा हे दिगंबरा
तूच घनश्याम तूच मुरारी कुंदन
लीला करुनी केले धन्य ते वृंदावन ll ५ ll
Comments
Post a Comment