कविता:- भेट तिची नी माझी .......

श्यामल संध्या, धुंद पवन हा
विरहते काळीज, साथ नवा हा

तुझी भेट होता, ग्रीष्म भासे वसंत
कटाक्ष होता तुझा, मी राही निवांत

असे वाटते, कधी भेटशी तू
दमलेल्या आयुष्याचा, मंद उसासा तू

भेट होण्याआधी, मज धडधड
भेट होता, क्षण सुटू नयेची धडपड

दिस धरिता पळू लागे, रात्र संपता साचू लागे
भेटण्याचा समय येता, क्षण एक युग भासू लागे

विरह हा शब्द, आता स्मरूनी साहवेना
तुझा आठव, मन स्थिर होऊ देईना   

तुला भेटता, अंकुरती फुलांच्या आशा
भेटीतील सुगंधी पाकळ्या, विसरू मी कश्या

वाटते कमळातील, भ्रमरापरी व्हावे
तुझ्या मिठीत, आयुष्याचे स्वप्न पहावे

वाऱ्यापरी वाहत, तुझ्या जवळी यावे
येताना श्वासातून भरून, काही सुगंध आणावे

क्षणांची भेट आता, क्षणभंगुर वाटते
सतत सहवास असावा, असे मनी वाटते

लपणे-छपणेभिऊनि भेटणे; बंद करावे
वेळ हीच, तुझ्यामध्ये आयुष्य गुंफावे

करितो विचार, तुला हर दिन भेटण्याचा
मंगल दिनी, तुझ्यासवे सप्त-पदी चालण्याचा

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Comments

Popular Posts