गवळण - यशोदे !!! पोरगा तुझा किती नटखट गं ssss …….

जाते मी जेंव्हा, पाण्याला 
मटका भरून, आणण्याला
वाटेत दिसता, त्या पाऊलखुणा
घाबरती साऱ्या, गवळणी राण्या

कान्हा तयार ना, ऐकण्याला
किती करू मी, विनवण्याला
कुणी नाही तयार, घरी जाण्याला
भिऊ लागती, त्याच्या निशाण्याला 

यशोदे !!! तुझा, पोरगा किती कटकटा  गंSSS ssss…….
फोडला भरलेला, आज माझा मटका गं ssss…….
  
मटका फुटूनी उभी मी, चिंब गं
अंगावरी ओघळले, प्रतिबिंब गं
मैत्रिणी मला, हसतात गं
लाज किती अशी मी, लपवू गं

हातात नुसती फुटकी, खापरं गं
कशी जाऊ मी आता, घराला गं
माय-बाप मला, पुसतील मग
चुकीचं खापर माझ्या, एकटीवर मग

यशोदे !!! तुझा, पोरगा किती अवखळ गं ssss…….
सगळे करुनी, भोळा सावळा गं ssss…….

थांब; चांगली अद्दल, घडविते त्याला
सांगते तक्रार, नंदबाबाला
तू; काही न करणार, त्याला;.......... माहित आहे......... आम्हाला
तू; काही न करणार, त्याला
ऐकून सोडणार, आमच्या बतावण्याला

यशोदे !!! तुझा पोरगा किती नटखट गं ssss ssss…….
सारी, खोडी करायची खटपट गं ssss…….


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

Comments

Popular Posts