About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, December 10, 2019

वासुदेव

विठ्ठलाचे पायी, ठेऊनिया डोई....

अस म्हणत टाळ वाजवत येणारा वासुदेव
बिचारा सोसायटीपुढे उभा राहतो, पूर्वीसारखं घर नाहीत, पायलीभर धान्य घेऊन येणारे नाहीत, सोसायट्यांच्या अजब नियमावली , बिचारा उभा राहतो, टेरेसमधून लोक आपल्या बाळांना ते ध्यान दाखवतात, टाळांचा आवाज, त्यांनाही गम्मत वाटते, पण दान काही मिळत नाही

हे चित्र पाहून माझा जीव कळवळतो, वासुदेव, दारात आलेला देवदूत, मला कुठेही जवळपास वासुदेवाचा तो गोड खडा आवाज जरी आला तरी मी गाडीवरून जाऊन काही न काही दान देऊन येत असतो, लहानपणीचे संस्कार आहेत...

पण आता लोक काही देत नाहीत, वाईट वाटते, पण हेच लोक, ख्रिसमस ला आपल्याच पोरांच्या डोकी विचित्र टोप्या घालून त्यांचे हसे करतात, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कुणाला कसलीच बळजबरी नाही...

पण वाईट याचे वाटते की, आपली संस्कृती हद्दीबाहेर घुटमळते आणि उसनं अवसान घरात घिरट्या घालत, त्याच कोड कौतुक होत.

धन्य असली आधुनिकता आणि असल्या पुढारल्या स्टाईली

वासुदेव, पिंगळा, कडकलक्ष्मी इत्यादी आपले मातीतले सगे सोयरे हे टिकलेच पाहिजेत...

एवढंच म्हणावं वाटत...

विठ्ठलाचे पाई, ठेऊनिया डोई
आवाज मधुर, अभंग गाई

तुझे येणे दारी, पंढरीची स्मृती
टाळाचीये नादी, दान घेई...वासुदेवा दान घेई

वासुदेवाने दान घेऊन, स्वीकार करून आम्हाला उपकृत करावे 🕉

🙏🌹🙏
बोला विठ्ठल विठ्ठल..
सचिन कुलकर्णी

LIKE Saarthbodh !!!