About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, April 8, 2021

रातभर जाम की रातभर बात कर


रात भर जाम की रात भर बात कर
Lyrics/ Tune/ Raw Audio Track - © सपु



 

 

Friday, April 2, 2021

चहासक्त

 चहासक्त

प्रत्येकाला काही तरी आवड असतेतशी आपल्याला चहा ची जाम आवड. चहा प्यायला फक्त कारण पाहिजेफार काही वेगळे कारण नसले तरी चालेल पण चहाच्या पक्क्या वेळेला चहा हवाच. वेळ सकाळची, दुपारची उशिराची दुपार आणि संध्याकाळ या चहाच्या अगदी न चुकणाऱ्या वेळा. त्यात पावसाळा किंवा हिवाळा असेल तर एखाद वेळ जास्त जोडली जाते.

ज्याने चहा शोधला आहे त्याचे अनंत उपकार मी जाणून आहेपूर्वी दिवसाला १८/१९ कटिंग चहा देखील व्हायचा जरा अतीच पण आजकाल जरा पथ्य ठेवले आहे. दिवसात ३ ते ५ बस्स त्याच्यावर गाडी जात नाही. त्यात आजकाल चहा चे पेव आले आहे. गुळाचातंदूर चहाबासुंदीआल्याचावेलचीचागवतीग्रीनलेमनकाळाअसे अनेक प्रकार. पण या सगळ्यात मला वाटते अमृततुल्यला तोड नाही. अमृततुल्य वाला मला शास्त्रीय गायका सारखा वाटतोत्याचा सगळा लवाजमा मांडलेला असतो आणि त्याच्या पद्धतीत तो सगळा  कार्यक्रम चालू असतो. इतर नवीन जे ब्रँड आले आहेत ते मला ऑर्केस्ट्रा सारखे वाटतातमोठी जाहिरातभपकेबाज आणि फटाफट काम. त्यात रस्त्याच्या कडेला काही जण हातात थर्मास आणि कागदी कप घेऊन फिरत असतात हे लोक मला वासुदेवाप्रमाणे प्रेमळ आणि सामाजिक वाटतातभाजीवाले वगैरे लोकांना हे अगदी समोर जाऊन चहा देतात. किती सुख आहे यार.

चहा पिणे आणि पाजणे हा एक धर्म आहेत्यातही बंधुतुल्य मित्रांबरोबर अमृतुल्य मध्ये चहा पिणे हे सुख आहे. एखादा मित्र खूप दिवस नाही भेटला तर एखादी शिवी हासडून मस्ती आली  का रे आला नाही च्या प्यायला असे म्हणण्यात जो आनंद आहे तो काय वर्णावा. हायवेएखादा निर्जन रस्ता अशा ठिकाणी चहाची टपरी दिसली कि आपसूक गाडी थांबते. प्रत्येक टपरीवाला हा एक कलाकार असतो,त्याच्या हाताची चव असते. माझ्या एका क्लायंटला मागच्या भर मे महिन्यात हायवेला भेटलो होतोकडक ऊन गाडीवर फिरून पुरता आंबलो  होतोभेटलो काम झालेबाजूच्या टपरीवर चहा पिऊ असे म्हणल्यावर तो हादरला  म्हणाला अरे वेळ बघऊन बघ मी म्हणालो अरे पावसाळ्यात चहा कोण पण पीलआता पिण्यात ,मजा औरच आहेअशा चहाच्या कैक आठवणी आहेत कित्येक संदर्भ चहाशी दृढ जोडले आहेत.

कधी कुणाच्या घरी गेलो आणि ५ मिनिटात जर स्वयंपाकघरातून कपाचा कींण कींण आवाज आला तर अंगावर रोमांच येतेअशी घरे हि मला फार संस्कारी वाटतात. चहा हा एक संस्कार आहे. चहामुळे माणसे जोडली जातात. समजा चहा पिऊन झाला असेल आणि कोणी समोरच्या बिल्डिंग मध्ये गच्चीत येऊन चहा पित असला तर मत्सर भाव जागा होतोपरत चहा प्यायची हुक्की येते.चहा आणि चाहत कुठे तरी सांगड बसते. कधी काही सुचले आणि कविता/ गाणे लिहायला बसलॊ तर रात्री चहा प्यायची मजा औरच. अंगात शीण  आला असला आणि समोर आल्याचा मस्त वाफाळणारा चरचरीत गरमागरम चहा आला तर सगळा शिण एक घोट घेताच क्षणात निघून जातो

कधी फार कंटाळा आला, दिवसभर जास्त काम झाले, तर रात्री एक कडक चहा मारला की गाढ झोप लागते, बऱ्याच जणांना याचे आश्चर्य देखील वाटते. मी आणि आमचा अण्णा/संज्या अगदी वेगळ्या क्षेत्रात आणि वेगळ्या ठिकाणी काम करतो, पण भेटून खूप दिवस झाले की सकाळी कामाला जाण्याआधी मध्ये वाटेत चहा मारून भेट पक्की असते.

चहा हे मोठे मार्केट आहे मोठी उलाढाल आहेकैक कुटुंबे यावर जगतात. कित्येक संसार चहाच्या व्यवसायावर फुलतातथोडक्यात काय चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्या दृष्टीने ते आसाम, दार्जिलिंग वगैरे मला तर आजोळ वाटतेचहाची पंढरीच जणूनुसते बघेल तिकडे चहाचे मळे.

मी जर अंदाज काढला तर आत्तापर्यंत कित्येक चहाचे मळे  फस्त  केले आहेत इतका चहा प्यायला असेल. कधी कधी तर वाटते रक्त तपासले तर हिमोग्लोबिन साखरइत्यादी घटकात तो लॅब वाला "टी" कन्टेन्ट पण टाकतो कि काय.

हम चाय के शौकीन नही हैहम खुद चाय का थर्मास है. थर्मास मध्ये जसा चहा मस्त गरम राहतो तसेच या चहा बरोबर मित्र मैत्रिणींच्या आठवणी आणि गप्पा सतत ताज्या राहतात. त्यामुळे चहा आणि चहावाला याचे आम्ही निःस्सिम  भक्तहे वेगळे सांगायला नकोच.

"घेतो का अर्धाघेउयाकी अर्धा" या वाक्यात खूप जिव्हाळा आणि आपुलकी दडलेली असतेम्हणूनच तो चहाचाय किंवा च्या आपल्याला अत्यंत प्रिय.

चहाचे हे पुराण  कसे वाटले सांगाचला नक्की लिहा आणि भेटा एक चरचरीत चहा मारूआणि इतकी आवड म्हणून कि कायमाझ्या नावात पण तो "च्या" त्यामुळेच येतो बहुतेक.

आपलाच,

🍵

सच्या (☕) कुलकर्णी ( सपु ) 

www.saarthbodh.com


Tuesday, January 5, 2021

निधी संकलन- वनवासी कल्याण आश्रम,

निधी संकलन- वनवासी कल्याण आश्रम,

वनवासी कल्याण आश्रम - अखिल भारतीय स्तरावर आदिवासी/ जनजाती समाजकरिता गेली ६८ वर्षे अव्यहात काम करणारी संस्था, जनजाती बंधूं भगिनींचे शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, रोजगार, खेळ प्राविण्य आणि त्यांची संस्कृती जपणे व प्रसार आणि संवर्धन अशा सर्व स्तरावर अत्यंत चिकाटीने काम चालते.

या सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या मुलांना आपण कल्याण आश्रमाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात निवासाची, खाण्या-पिण्याची, आरोग्याची अशी सगळी सेवा पुरवतो, व sachनजीकच्या जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळेत प्रवेश घेऊन देतो, त्यांच्या अभ्यास व इतर खेळातील रुचिंमध्ये प्रगती व्हावी म्हणून आपण काहीं त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची मदत पण घेतो.

ही अशी वसतिगृह चालवणे, त्यांच्या दैनंदिन खर्च, मग अन्न/धान्य, दूध, काही ठिकाणी वसतिगृहाचे भाडे, गाडी वापरली जाते तिचे इंधन, डागडुजी, जी मुले राहतात त्यांच्या दैनंदिन वापरातील सर्व वस्तू, वीज बिल, गॅस अशा अनेक बाबी रोजच्या रोज पूर्ण करणे हा एक मोठा संकल्पच आहे.

या बाबतीत कल्याण आश्रमाचे सर्व देणगीदार हे अगदी परमेश्वर स्वरूप सिद्ध असतात. कित्येक देणगीदार तर असे आहेत की ज्यांना त्यांचे नाव कुठेही आलेले अजिबात चालत नाही, काही नवीन देणगीदार जोडले गेले तर सुरुवातीला त्यांना थोडी शंका असते, पण प्रत्यक्षात भेट झाली, कामाची संकल्पना आणि इतके वर्षांचे कार्य सांगितले की त्यांची शंका कमी होते, कारण समाजात काही घटकांनी सेवा विषयात सुद्धा काही चुकीची कामे केल्याने, प्रत्येक माणसाचा सहजेच विश्वास बसेल असे नाही.

कारण एखादी व्यक्ती जी देणगी देते, ती त्याच्या कष्टाच्या कमाईतून काही सत्कारणी कारणासाठी लागावी म्हणून देत असते, आपल्याकडे म्हणतात ना, दान सत्पात्री असावे, अगदी त्याच अनुषंगाने. मग काही जण आम्ही वस्तुरुप देणगी देतो म्हणतात, मग त्यांना त्या त्या महिन्यातील आवश्यक यादी दिली जाते, मग त्यातील काही वस्तू ते देतात. कित्येक वेळी मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या वस्तू स्वतः घेऊन गेलात तर फार उत्तम होईल, त्यानिमित्ताने ते वसतिगृह पाहतात, एकूणच शिस्त, व्यवस्थापन पाहिले, मुलांशी गप्पा झाल्या, वसतिगृह प्रमुख, की जो या सर्व व्यवस्थेचा कणा आहे त्याच्याशी बोलणे झाले कि त्यांचा विश्वास दृढ होतो.

कल्याण आश्रमाच्या स्थापनेपासून, आदरणीय बाळासाहेब व त्यापासून सर्व पूर्णवेळ, अंशकालीन, किंवा कार्यकारिणीतील सर्व स्तरातील सदस्य हे ज्या आत्मीयतेने , राष्ट्रप्रेम व बंधुता या विचाराने आणि विश्वासाने संस्थेचे काम करतात, समाजात वावरताना दिसतात, तो खरेच वाखाणण्याजोगा विषय आहे, यातूनच संस्था वृद्धिंगत होते, अशा थोर लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पुण्याईतूनच खरे तर सर्वांना काम करण्याची ऊर्जा व संवेदना मिळते, त्यांनी बनवलेल्या वाटेवर आपणाला फक्त चालायचे आहे, वाटेतील काटे, खाच खळगे त्यांनी त्यांच्या सेवाभावी व निःस्वार्थ वृत्तीने केंव्हाच दूर केले आहेत, बराचसा प्रशस्त व आश्वस्त दिशा असलेला उज्वल मार्ग या सर्व पुण्य विभूतींनी तयार करून दिला आहे, आपणाला फक्त त्यात तितकाच नि:स्वार्थपणा, सेवाभाव, राष्ट्रप्रेम व बंधुता यांची अत्युच्च पातळी गाठून सेवा कार्य करायचे आहे.

तसे पाहिले तर समाजातील गरज आणि ती पूर्ण करण्यासाठीची तळमळ, याचा ताळमेळ हा ईश्वरी इच्छेने पूर्ण होतो, गरजू माणसापर्यंत एखाद्याची मदत पोचते, इथे निधी संकलन करणारा निमित्त मात्र असतो, प्रस्तुत व्यक्तीची इच्छा; मदत स्वरूप आश्रमाच्या कार्यात पोहोचते, व ती गरज पूर्ण होते, ईश्वरी इच्छेने या गोष्टी घडतात असे माझे वैयक्तिक मत आहे, त्या ईश्वरी अनुसंधानाचे घटक, निमित्त रूपातून व्हायला मिळते हे अलभ्य भाग्यच. 

देणगी किती मिळते याला तितके महत्व नसते, कारण कुणी किती मदत केली यापेक्षा, काय भावनेने त्यांनी मदत केली, त्यामागची तळमळ, ती आर्त सद्भावना आणि त्या देणगीदाराची सकारात्मक स्पंदने एखादी गरज अगदी व्यवस्थित पूर्ण करतात, कल्याण आश्रमाची परंपरा समाजाला माहीत असल्याने आपल्या योगदानातील पै आणि पै सत्कार्यालाच वापरली जाणारी आहे याचा त्यांना दृढ विश्वास असतो.

बऱ्याच वेळा हवा तितका निधी जमत नाही, धान्य जमत नाही, मग अगदी खास काही देणगीदार आहेत ज्यांनी अक्षरशः बजावून ठेवलेले असते की अगदी अडीनडीला निःसंकोचपणे फोन करत जा, अशी काही कुटुंबे आहेत की ज्यांना अगदी आपल्या वडीलधाऱ्यांकडे मागतो त्याप्रमाणे अगदी हक्काने देणगी मागता येते, व ती तत्काळ मिळते देखील. अशा देणगीदारांच्या काही पिढ्या झाल्या आहेत ज्या कायम कल्याण आश्रमाच्या उपक्रमांना सढळ हस्ते मदत करतात.

कुणा देणगीदाराचे नाव, उल्लेख त्यांनी टाळण्याचे सांगून देखील , केवळ एक विस्मयकारी अनुभव सांगणे राहवत नाही म्हणून त्यांची क्षमा मागून इथे उल्लेख करत आहे.

नुकतीच 3 वर्षांपूर्वीची आठवण, उदयजी खर्डेकर नावाचे एक गृहस्थ आहेत, कल्याण आश्रमाची ओमनी गाडी अगदी बंद अवस्थेत होती, त्यामुळे वसतिगृहावर वस्तू/धान्य पाठवणे, धान्य संकलन, आरोग्य रक्षक योजनेची औषधे पाड्यांवर पाठवणे, कुणी आजारी कातकरी बंधू/ भगिनी यांना उपचाराकरिता पुण्यात आणणे, अशी बरीच कामे खोळंबत असत. श्री उदयजी यांच्याकडे विषय काढला, खरे तर आहे त्या गाडीची दुरुस्ती, किंवा तात्पुरती काही इतर वाहन व्यवस्था किंवा जुनी एखादी मिळेल का ! अशा माफक अपेक्षेने विषय काढला, परंतु कल्याण आश्रमाचे काम किती निःस्वार्थी आहे हे माहीत असल्याने, श्री उदयजी खर्डेकर साहेबांनी आणि त्यांचे बंधू श्री मनोज खर्डेकर यांनी मिळून 2 आठवड्यात मारुती इको, नवी कोरी CNG गाडी कल्याण आश्रमास घेऊन दिली, अशी दानशूर व देव माणसे आहेत म्हणून हा सेवा यज्ञ अव्याहत चालू आहे.

असेच पुण्यातील श्रीकांत जोशी म्हणून एक गृहस्थ आहेत जे दर वर्षी 2 आदिवासी मुलींच्या नर्सिंग अभ्यासक्रमाचा, वसतिगृह व खानावळ खर्च, असा पूर्ण खर्च सगळा, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सलग ३/४ वर्षेपर्यंत करतात. असेच श्री विवेकजी सोमण, दात्ये साहेब, सेवा चॅरिटेबल आणि धीरज भाई, गणेशजी, श्री प्रद्युमन कुलकर्णी जी, तेजसजी, श्री प्रशांत पाटील शिक्षक, असे किती तरी उल्लेख खरे तर आहेत, पण किती लिहावे आणि किती सांगावे, आकाशातील ताऱ्यांची मोजदाद थोडीच होणार आहे.

कल्याण आश्रमात काम करताना बऱ्याच वेळा निधीची चणचण जाणवते पण एक लक्षात येते की परमेश्वराने देणगीदार, हितचिंतक, पाठीराखे, कार्यकर्ते देताना अगदी कसलीच उणीव ठेवली नाही, हे अपार धन इतके उधळून वर्षावलेले आहे की उर आनंदाने आणि त्याच्या कृपेच्या मायेने उचंबळून येतो.

आश्रमाच्या कार्यात थेट अथवा इतर कोणत्याही मार्गाने मदत करणारे, अगदी साधे म्हणजे व्हाट्सप वर येणारे आश्रमाचे संदेश व माहिती/ उपक्रम पुढे पाठवणारे, त्याचा पाठपुरावा करणारे, लोकांना समजावून विस्तृत माहिती देणारे, हे असे सर्व जण म्हणजे जणू देवांशच आहेत. आपले जनजाती बांधव हे कुणी वेगळे नाहीत, हे आपल्या भारतमातेची लेकरेच आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे व वैभव प्राप्त करून देणे हे आपले इति कर्तव्यच आहे.

आपले जनजाती, आदिवासी बंधू भगिनी हे सुखी, सुशिक्षित, स्थिरस्थावर व कर्तृत्ववान होवोत या एकमेव उद्देशाला स्मरून आपणा सर्वांना अधिकाधिक चांगले काम करायचे आहे. या मनुष्य जन्माचा आपल्या समाजातील गरजूना काही उपयोग झाल्यास या जन्माचे अधिक सार्थकच होईल, हि आपल्या सर्व संतांची शिकवण स्मरून आपल्या जनजाती बंधू भगिनींची सेवा करणे हीच या मानव जन्माची कृतार्थता ठरेल. 

श्री गुरुजींवर लिखित " चाहीये आशिष माधव, नम्र गुरुवर प्रार्थना" हे भावपूर्ण प्रेरक गीत ऐकून मला त्याच चालीवर सुचलेल्या ओळी मी अशा सर्व विभूती स्वरूप व्यक्तींच्या चरणी समर्पित करतो. आपण सर्वांनी चालवलेला वनवासी कल्याण आश्रम सेवा यज्ञ आपल्या सर्व जनजाती बंधू भगिनींचे दृढ कल्याण कारणासाठी असाच अखंड चालू राहो ही सदगुरूचरणी विनम्र प्रार्थना !!!

हो रहा हर कण उजागर, फैलती राष्ट्रीयता
तत्व सूरज का लिये हम, हर दिशा मे जा रहे है
मिल गया जो भी अंधेरा, तेज का अब अंश है
ना रहे कोई विषमता, ना रहे कोई समस्या
सबकी है अब एक आस्था, जय भारती जय एकता

दो हमे वो दिव्यशक्ती, हो सफल हर कामना
हम है सेवक मातृभू के, ये हमे अभिमान है
जो चले हम मार्ग कोई, देश हित की बात है
कर चले हर क्षण समर्पित, हर कृती संकल्प है
देशभक्ती यज्ञ पावन, श्वास हर समिधा बने

सद्गुरू कृपाभिलाशी
सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम

LIKE Saarthbodh !!!