About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Friday, April 2, 2021

चहासक्त

 चहासक्त

प्रत्येकाला काही तरी आवड असतेतशी आपल्याला चहा ची जाम आवड. चहा प्यायला फक्त कारण पाहिजेफार काही वेगळे कारण नसले तरी चालेल पण चहाच्या पक्क्या वेळेला चहा हवाच. वेळ सकाळची, दुपारची उशिराची दुपार आणि संध्याकाळ या चहाच्या अगदी न चुकणाऱ्या वेळा. त्यात पावसाळा किंवा हिवाळा असेल तर एखाद वेळ जास्त जोडली जाते.

ज्याने चहा शोधला आहे त्याचे अनंत उपकार मी जाणून आहेपूर्वी दिवसाला १८/१९ कटिंग चहा देखील व्हायचा जरा अतीच पण आजकाल जरा पथ्य ठेवले आहे. दिवसात ३ ते ५ बस्स त्याच्यावर गाडी जात नाही. त्यात आजकाल चहा चे पेव आले आहे. गुळाचातंदूर चहाबासुंदीआल्याचावेलचीचागवतीग्रीनलेमनकाळाअसे अनेक प्रकार. पण या सगळ्यात मला वाटते अमृततुल्यला तोड नाही. अमृततुल्य वाला मला शास्त्रीय गायका सारखा वाटतोत्याचा सगळा लवाजमा मांडलेला असतो आणि त्याच्या पद्धतीत तो सगळा  कार्यक्रम चालू असतो. इतर नवीन जे ब्रँड आले आहेत ते मला ऑर्केस्ट्रा सारखे वाटतातमोठी जाहिरातभपकेबाज आणि फटाफट काम. त्यात रस्त्याच्या कडेला काही जण हातात थर्मास आणि कागदी कप घेऊन फिरत असतात हे लोक मला वासुदेवाप्रमाणे प्रेमळ आणि सामाजिक वाटतातभाजीवाले वगैरे लोकांना हे अगदी समोर जाऊन चहा देतात. किती सुख आहे यार.

चहा पिणे आणि पाजणे हा एक धर्म आहेत्यातही बंधुतुल्य मित्रांबरोबर अमृतुल्य मध्ये चहा पिणे हे सुख आहे. एखादा मित्र खूप दिवस नाही भेटला तर एखादी शिवी हासडून मस्ती आली  का रे आला नाही च्या प्यायला असे म्हणण्यात जो आनंद आहे तो काय वर्णावा. हायवेएखादा निर्जन रस्ता अशा ठिकाणी चहाची टपरी दिसली कि आपसूक गाडी थांबते. प्रत्येक टपरीवाला हा एक कलाकार असतो,त्याच्या हाताची चव असते. माझ्या एका क्लायंटला मागच्या भर मे महिन्यात हायवेला भेटलो होतोकडक ऊन गाडीवर फिरून पुरता आंबलो  होतोभेटलो काम झालेबाजूच्या टपरीवर चहा पिऊ असे म्हणल्यावर तो हादरला  म्हणाला अरे वेळ बघऊन बघ मी म्हणालो अरे पावसाळ्यात चहा कोण पण पीलआता पिण्यात ,मजा औरच आहेअशा चहाच्या कैक आठवणी आहेत कित्येक संदर्भ चहाशी दृढ जोडले आहेत.

कधी कुणाच्या घरी गेलो आणि ५ मिनिटात जर स्वयंपाकघरातून कपाचा कींण कींण आवाज आला तर अंगावर रोमांच येतेअशी घरे हि मला फार संस्कारी वाटतात. चहा हा एक संस्कार आहे. चहामुळे माणसे जोडली जातात. समजा चहा पिऊन झाला असेल आणि कोणी समोरच्या बिल्डिंग मध्ये गच्चीत येऊन चहा पित असला तर मत्सर भाव जागा होतोपरत चहा प्यायची हुक्की येते.चहा आणि चाहत कुठे तरी सांगड बसते. कधी काही सुचले आणि कविता/ गाणे लिहायला बसलॊ तर रात्री चहा प्यायची मजा औरच. अंगात शीण  आला असला आणि समोर आल्याचा मस्त वाफाळणारा चरचरीत गरमागरम चहा आला तर सगळा शिण एक घोट घेताच क्षणात निघून जातो

कधी फार कंटाळा आला, दिवसभर जास्त काम झाले, तर रात्री एक कडक चहा मारला की गाढ झोप लागते, बऱ्याच जणांना याचे आश्चर्य देखील वाटते. मी आणि आमचा अण्णा/संज्या अगदी वेगळ्या क्षेत्रात आणि वेगळ्या ठिकाणी काम करतो, पण भेटून खूप दिवस झाले की सकाळी कामाला जाण्याआधी मध्ये वाटेत चहा मारून भेट पक्की असते.

चहा हे मोठे मार्केट आहे मोठी उलाढाल आहेकैक कुटुंबे यावर जगतात. कित्येक संसार चहाच्या व्यवसायावर फुलतातथोडक्यात काय चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्या दृष्टीने ते आसाम, दार्जिलिंग वगैरे मला तर आजोळ वाटतेचहाची पंढरीच जणूनुसते बघेल तिकडे चहाचे मळे.

मी जर अंदाज काढला तर आत्तापर्यंत कित्येक चहाचे मळे  फस्त  केले आहेत इतका चहा प्यायला असेल. कधी कधी तर वाटते रक्त तपासले तर हिमोग्लोबिन साखरइत्यादी घटकात तो लॅब वाला "टी" कन्टेन्ट पण टाकतो कि काय.

हम चाय के शौकीन नही हैहम खुद चाय का थर्मास है. थर्मास मध्ये जसा चहा मस्त गरम राहतो तसेच या चहा बरोबर मित्र मैत्रिणींच्या आठवणी आणि गप्पा सतत ताज्या राहतात. त्यामुळे चहा आणि चहावाला याचे आम्ही निःस्सिम  भक्तहे वेगळे सांगायला नकोच.

"घेतो का अर्धाघेउयाकी अर्धा" या वाक्यात खूप जिव्हाळा आणि आपुलकी दडलेली असतेम्हणूनच तो चहाचाय किंवा च्या आपल्याला अत्यंत प्रिय.

चहाचे हे पुराण  कसे वाटले सांगाचला नक्की लिहा आणि भेटा एक चरचरीत चहा मारूआणि इतकी आवड म्हणून कि कायमाझ्या नावात पण तो "च्या" त्यामुळेच येतो बहुतेक.

आपलाच,

🍵

सच्या (☕) कुलकर्णी ( सपु ) 

www.saarthbodh.com


7 comments:

  1. फारच छान! रस्त्यावरील टपरी डोळ्या समोर उभी राहिली- तिथल्या वाफाळत्या चहाबरोबर. संस्कारी घरे हळू हळू जुन्या चाळी प्रमाणे नामशेष होत चालली आहेत ! छानच लिहिले आहे तुम्ही. अमृततुल्य ची आठवण विसरता येणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद , आपली प्रतिक्रिया खूप आवडली, अमृततुल्य ला तोड नाही नक्की वाचत राहा, www.saarthbodh.com

      Delete
  2. नुसते चहा हे नाव जरी काढले तरी समोर असा वाफाळलेला चहाचा घोट घेतांना मी दिसतो,आणि त्यात तुमची नवीन चाहवरची पोस्ट,
    क्या बात है... एकदम मस्त खूप आवडली,
    असेच मस्त मस्त येऊन दे वाचायला

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपली प्रतिक्रिया खूप आवडली, नक्की वाचत राहा
      www.saarthbodh.com

      Delete
  3. Replies
    1. धन्यवाद , आपली प्रतिक्रिया खूप आवडली,
      अमृततुल्य ला तोड नाही
      नक्की वाचत राहा, www.saarthbodh.com

      Delete
    2. चहा, कधीही कुठेही

      Delete

LIKE Saarthbodh !!!