About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Monday, May 2, 2011

कविता:- चित्त माझे त्रस्त आहे.......

Poem published on Antaraal.
http://antaraal.com/e107_v0617/e107_plugins/custom_ant_articles/2011/Aug2011_kavita_SK.pdf
-----------------------------------------------------------------------------------------------------------
काय करावे काही कळेना; कुठेतरी कुरबुर आहे  
सर्व गोष्टी  हाती असूनी; कुठेतरी अस्वस्थ आहे

नोकरीच्या सर्व इच्छा; पुरुनी मी आश्वस्त आहे
तरी सुद्धा भविष्याचा; चिंतातूर मी जंतू आहे

सवंगडी ते जुने आता; प्रत्येकास भेटतो आहे
तरी सुद्धा एका कुणाची; साद मी मुकतोच आहे

घरामध्ये तसे पाहता; सर्व काही मस्त आहे
तरी सुद्धा कुठेतरी; एक धागा निसटला आहे

जुन्यापुराण्या आठवणींचा; डोलारा सावरलो आहे
काळाच्या ओघात मी; काही तरी गमावलो आहे

अध्यात्म यातुनी साथ देईल; असे एकदा वाटले जरी 
नंतर कळले मी भलताच; नवखा त्या वाटेवरी

देव आहे मान्य आहे, कृपा होईल खात्री आहे
तरीसुद्धा चालू दु:खाच्या; मी असा अधीन आहे

संसार तसा छान चाललाय; त्यात जरा मी मस्त आहे
प्रभूच्या आशीर्वादाने; हातपाय आपला मारतो आहे

तसे एकूण पाहता मित्रांनो; माझे सारे मस्त आहे,
तरी सुद्धा का कळेना; चित्त माझे त्रस्त आहे




© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!