About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Friday, May 6, 2011

कविता:- चेहरे आणि मुखवटे.......

रस्त्यावरून  जाताना, एखादा कोणी, जरा वेगळा वाटत असतो
काहीतरी लपवून, वेगळेच काही भासवत असतो
असे वाटते, त्याचा, खरा रस्ता वेगळा असतो
पण सगळे चालतात म्हणून, एका ठराविक वाटेने जात असतो

वाढदिवस करताना, केक आणि मेणबत्ती वापरतो
"औक्षण" करायला, जाणून बुजून तर विसरलेला नसतो?
स्व:ताच्या बाळांचे वाढदिवस, आपल्या प्रथेने साजरे करायला, असा कुणाला भीत असतो?
मनात नसताना असा, वाहवत का जात असतो?

घरी जेवायला बसल्यावर, आडवा हात मारत असतो
हॉटेलमध्ये मात्र त्याने, काटा-चमचा पकडलेला असतो
हेतू जरी फक्त, जठराग्नी शांत करण्याचा असतो
यात सुद्धा बहुतेक तो, दुसऱ्याची आवडनिवड पाळत असतो

नसेल समजा कंपनीत काम, पण "वाट लागली आहे असे सांगत असतो
लोकांना खरे सांगायला, का असा कचरत असतो?
जो पगार देणारा आहे; त्याला या गोष्टीचा त्रास नसतो
सगळ्यांना खोटे सांगताना, याने स्व:ताला चक्क फसवलेला असतो

कोणीतरी एकाने, महागडी वस्तू घेतलेली असते
याची ऐपत नसताना, मनात ईर्ष्या आलेली असते
उसनवारी करून, हौस भागवायची असते
दुसऱ्याची नक्कल करायची, हि कसली "स्टाईल" असते?

घरातल्या लोकांना सकाळी उठल्यावर, गुड मॉर्निंग म्हणतो
मातृभाषेचे कौतुक सांगून, स्व:ताच्या पोरांना मात्र, इंग्लिश शाळेत घालतो
जवळच्या दोस्तांना, "वेलकम" आणि "थँक्यू" म्हणतो
मला वाटते माणूस असा, फॅशनच्या दबावाखाली असतो
चेहरा एक आणि मुखवटा एक, असा का वागत असतो?  

आजकाल मोठ्या लोकांना, खूप सारे टेन्शन असते
जरा वेगळे वाटावे म्हणून,"ऑफ़िशिअल पार्टी" ठेवलेली असते
याने कधी घेतलेली नसताना, बाकीच्यांचीच जास्त इच्छा असते
आपण बावळट दिसू नये म्हणून, याची पकड, ग्लासवर गेलेली असते
इतक्या दिवसाच्या; यालाच पटलेल्या, संस्काराची आज माती झालेली असते
आणि थोडे फार कधीतरी चालते, मी आता मोठा आहे, माझा तेवढा ताबा आहे
अशी याने आपल्या मनाची; लोकांच्या इच्छेसाठी, खोटी समजूत घातलेली असते

मनात नसताना माणूस, कुणाला घाबरून वागत असतो?
आवड एक असताना, निवड दुसरी का करत असतो?
सगळा फक्त अनुकरण किंवा नक्कल, करण्याचा छंद असतो
एखादाच वाघाचा बच्चा, आपला सच्या-तेंडल्य किंवा रजनीकांत असतो
तो कुठेही असो त्याचा, चेहरा आणि मुखवटा एकच असतो


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

1 comment:

  1. very true picture about today's urbanised human being :)

    ReplyDelete

LIKE Saarthbodh !!!