About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, May 3, 2011

कविता:- कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

कितीही तप्त जरी; सूर्य देई तेज साऱ्या जगाला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

डाग कितीही असोत चंद्रमा; सदा देई शीतल छायेला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

कितीही गलिच्छ असो; काक तो गती देई पिंडाला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

रूतणारे ते बोचक काटे; रक्षिती सदैव गुलाबाला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

दात दाढा विक्राळ भयंकर; वाघीण संगोपे पिल्लाला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

रस्तोरस्ती श्वान भुकेलेकदा   चुकती इमानाला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

चहूदिशी फिरोनीदिशा  उमजोनी; पक्षी  चुकती घरट्याला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

तप्त प्रखर; तो अग्नी भयंकर; देई नवी झळाळी सोन्याला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

गात्र गलीत वार्धक्य जरी ते; परमेश्वर भेटवी माणसाला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

अपयश येता जाणीव होई; नवी उमेद विजयाला
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

जितकी बिकट परिस्थिती;तितका आळविला जाई देवाला  
कोण जाणे परमेश्वराने; कसा कुणाला बनवला

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!