About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, May 3, 2011

कविता:- कोण विचारतो विलायतेला.......

कोण विचारतो विलायतेला.......

हाय हॅलो काय म्हणतो; मजा नाही हाक मारण्याला
काय भाव काय म्हणतो; यात प्रेम आहे ऐकणाऱ्याला

अजूनही पोरे खेळ खेळतात; सुट्टीला आणि सांच्याला
विटीदांडू, पतंग, गोट्या, टायर; मजा रे कसली त्या पूल अन् स्क्वाशला

आई-बा आमचे आम्हाला प्रिय; उगाच नाही जात "थँक यू" म्हणायला
रोज त्यांची पूजा करतो; कोण विचारतो " पॅरेंट्स डे" ला

मित्र भावा आमचे; लई भारी, काही नाही लागत मैत्री टिकवायला
सांगता समजते मन एकमेकांचे; कोण विचारतो "फ्रेन्डशिप डे "ला

कुणाला फसवायचे नाय, फुकटचे खायचे नाय, असेच वागतो हर दिवसाला
रक्तातच आमच्या संस्कृती असली, कोण विचारतो "कल्चरल  डे" ला

जोडीदार आमचा आई-बा बघतील, नाहीतर आम्ही बी बघू वेळेला
मैत्रीत शक्यता तपासतच नाहीतर कोण विचारतो "व्हॅलेंटाइन  डे" ला   

कडक उन्हाळा; झकास हिवाळा, पावसाळा एक नंबर भिजायला
स्नोफॉल मुळे, जर बाहेरच पडता येत नसेल; तर कोण विचारतो ऑनसाईटला    

बर्गर-पिझ्झाहॉटडॉगपास्ता किंवा किवीबेरी असतील बरे चवीला
भेळ, मिसळ,भजीवडा, डोसा-इडलीआंबाकैरी, नाद नाही यांच्या चवीला  

फेसबुकऑरकूट; इमेल; ट्विटर, मजा कसली त्या भेटण्याला
फोन टाकता दोस्त चौकात येतो, नाद नाही आमच्या मैत्रीला  
      
पन्नास डॅमहजार कॅनॉल; शेकडो टॉवर असतील विलायतेला
राजगड; रायगड; प्रतापगड, शिवनेरी, तोड नाही त्यांच्या रचनेला

मुबलक पाणी, भरपूर वीज ,चकाचक रस्ते आणि सुविधा असतील ढीग परदेशाला
अहो इथेच जन्मलो; इथेच माती होणार आमची, कोण विचारतो विलायतेला   


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!