About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Monday, May 23, 2011

कविता:- माझ्या घरी घननिळा, श्रावण फुलोनी आहे.......

संसाररुपी वेलीवर बालरूपी फुल उमलणे, हि प्रत्येक आई-बापाची इच्छा असते.
थोडा उशीराच का होईना, पण काहींच्या घरात बाळराजा किंवा एक परीराणी अवतरते.
आपल्या लहानग्या बद्दलचे त्याचे/तिचे मनोगत.......खास करून कामावरून घरी जाताना.



अविश्रांत दिस सरताना, गोकुळीची साद येते
पाहीन कधी साजिरे, दृष्टी पथास आहे      ll ll    

हलकेच घरी जाताना, मंद झुळूक भासे
ओढ अधीर झाली, पाऊलांना वेग आहे      ll ll    

घरचा ध्यास आता, रोजचा वाढला आहे
माझ्या घरी घननिळा,  श्रावण फुलोनी आहे   ll ll     

भाबडे भाव गोजिरे, दृष्टी असीम आहे
निरागस नजरेत भरुनी, परमेश्वर निस्सीम आहे ll ll     

विश्वात असा आमुच्या, चैत्र बहरला आहे
परमेश्वरी कृपेचा, घन खास बरसला आहे   ll ll   

सांजेस तिमीर भरताना, दीप तेजाळला आहे
लहानग्या तेजात सारा, उद्याचा प्रयास आहे  ll ll   

उपकार त्या विधात्याचेआमचे भाग्य उदेले
त्याच्याच कृपेने दुडके, पाऊल घरी पडलेले   ll ll     
 
© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!