About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Friday, May 6, 2011

कविता:- माझा साहेब.......कालचा आणि आजचा

बस आणि गर्दीची; मी जुगलबंदी बघतो
रोज सकाळी असाच; कामावरती येतो,
आल्या आल्या घाई असते; कार्ड पंचिंग करायची
घाई पण झालेली असते; मेलबॉक्स बघायची

मेलबॉक्स बघता; सगळे फाटलेले दिसते
काल केलेल्या कामाला; पार आग लागलेली असते
कँटीनवाल्याचा टर्न ओव्हर करायला; भूक लागलेली असते
तिकडे साहेबाची मेसेंजरवर; पिंग आलेली असते

मी नाश्ता खायच्याआधी; साहेब मला चावत असतो
जागेवर बोलावून; मी कसा कामचोर; हे बोंबलून सांगत असतो
आपणच कंपनी चालवतो; असे जणू तो भासवत  असतो
तो नेहमीसारखा झापल्यासारखेआणि मी ऐकल्यासारखे दाखवत असतो

मला त्याच्या बोलण्यात; काही रस नसतो
त्याचा सगळा पाढा; मला पाठ झालेला असतो
कँटीनमधला गरम नाश्ता; सारखा खुणावत असतो
आणि आताहा कधी सोडतो; याची मी वाट बघत असतो

नाश्ता करताना देखीलसाहेबाचे टेन्शन असते
आता तो दिवसभर चावणार; हि कल्पना वाईट असते
जागेवर आल्यावर; परत पिंग येतो
कामवेळेत आणि परफेक्ट करा”; असा पॉपअप देऊन जातो   

बहुतेक साहेबाचे घरी; काही तरी फाटलेले असते
सकाळी सकाळी सापडायलाआमचेच नशीब खराब असते
दुपारपर्यंत जरा; शांत झालेला दिसतो
बहुतेक त्याचा मामला; थोडा थंडा झालेला असतो 

घरी निघताना; मी सगळे नीट सांगून; कलटी टाकलेली असते
बस पाशी येताच; तेची परत रिंग वाजलेली असते
आता परत बोलावतो का काय; याची मनात धास्ती असते
झक मारून मी घरीकमीटमेंट दिलेली असते

फोनवर मामला; थोडक्यात उरकतो
मी बसमध्येएक पाय आत दुसरा बाहेर”; असा उभा असतो
शेवटी तुकडा पडतो; आणि साहेब जरा खुश होतो
मनातल्या मनात घरी जायचा; रस्ता माझा मोकळा होतो

बस मध्ये बसल्या बसल्या; माझा फोन स्वीच ऑफ होतो
दिवस कसा गंडला; याचा विषय चालू होतो
मनात विचार येतो; साहेब असा का वागतो
मला वाटते त्याच्या घरी; तोदुर्लक्षितझालेला असतो

घरचा राग तो; कामावर काढत असावा
मला कोण उलटे बोलणार "मी साहेब आहे"; हा त्याचा विचार असावा
देवाला प्रार्थना केली; किसाहेबम्हणून नको; पण माणूस म्हणून याला सुधार
बहुतेक देवाने प्रार्थना ऐकली; तसाच घडला काहीसा प्रकार

एक दिवस दुपारीसाहेबाला घरून फोन आला
चपापतच उठला; चेहरा गोरामोरा झाला
बहुतेक त्याच्या आईची; तब्येत बिघडली होती
माणूसघाणी वागण्यामुळे; जवळची माणसे लांब गेली होती

मी सगळा प्रकार पहिला, आणि बोललो काय झाले साहेबा
लवकर घरी जायचे बोलला, पण ट्राफिकच्या सगळ्या बोंबा
मी म्हणालो; मी नेतो पटकन; आहे माझी गाडी
आशेचा किरण दिसताच; जरा खुश झाला गडी

किक मारून २० मिनिटात; त्याला सुमडीत घरी नेला
दवाखान्याचे निपटून; कंपनीचा रस्ता धरला
संध्याकाळी गाडीपाशी येताच ; त्याचा परत फोन आला
मला वाटले आता परत; कामाचा झोल झाला

मला बोलला; “थँक्यू डीअरखुप  मदत झाली
मी खरेच तुला त्रास देतो, पण तुला माझी दया कशी आली?
मी बोललो; आमच्या आई-बा ने; हेच शिकवले मला
अडचणीत कोणीही असलातरी पहिली मदत करतो त्याला

मी बोललो; गरजेला साहेब; फक्त माणुसकीच कामाला येते 
तुमच्या इथल्या डेसिगनेशनलागेटबाहेर कोण विचारते
एखाद्याला मदत करू नका, पण कुणाला दुखवायचेपण नसते
गरजेला पैसे अन स्टेटस काय कामाचे असते?

साहेबाचा टोन; जरा बदलला होता
मला हा बदल चांगलाच; लक्ष्यात आला होता
चौकशी आणि आभारझाल्यावर; मी कामाचा विषय काढला
"ते सगळे नंतर बोलूअसा माझा साहेब बोलला!!!

माझा माझ्यावर विश्वास बसेना; चिमटा काढून पाहिला
तोवर तिकडे आमच्या बसने; स्टार्टर होता मारला
घरी गेलो; जाऊन स्वस्थ विचार केला
माणसला काही “प्रसंगच शिकवतो का”? चुका सुधारण्याला?

खरेच सांगतो दोस्तानो; करिअर आणि कंपनी; म्हणजे आयुष्य नाही
गाठीला आपल्या असले पाहिजेत; सच्चे दोस्त काही
शहाणा माणूस तोच; जो काम सोडूनइतर गोष्टीला पण महत्व देतो
खरेच विचार करा; आजकाल माणुसकीला कोण विचारतो?

आता मी कामावर; ख़ुशीखुशीत येतो
पहिले नाश्ता करतो; आणि झपाटून काम पण करतो
साहेब माझा आता; एक दोस्त आणि चांगला माणूस झालेला आहे
कंपनी हेच आयुष्य नाहीहा विचार त्याला कळून चुकला आहे

कॉर्पोरेट जगातील; एक "कामकरी माशी"

© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

1 comment:

  1. sagalya saheb lokana tumachyasarkhi ekhadi tari kamkari mashi milude. corporate jagach kalyan hoeil.
    Janhavi sanket taur

    ReplyDelete

LIKE Saarthbodh !!!