About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Thursday, May 26, 2011

कविता:- मी पार असा गोंधळून जातो.......

रोजच्या जगण्यात माझ्या, मी किती काही ऐकत असतो
सगळेच मला खरे वाटते, आणि मी पार गोंधळून जातो

कष्टाची कमाई; हीच कशी खरी; असे कोणीतरी समजावून सांगतो
अरे; शेअर्सचा पैसा कमवायला पण; अभ्यास लागतो, हा विचार देखील पटून जातो  

घर आता कुठे घेतो? दर कमी होतील, म्हणून मी कधी वाट पाहतो
अरे; असे दर कधी कमी होतात का? असे म्हटले कुणी; तर लगेच जागा पहायलाही जातो

भ्रष्टाचार वाईट असतो, असे ऐकून मी सरळपणे वागत असतो
भ्रष्टाचार केला तरी; आजच्या जमान्यात पैसा बोलतो, हे नकळत  समजून जातो

हुजरेगिरी करून काय मिळणार? आपला स्वाभिमान असला पाहिजे, असे कोणी बोलतो
अरे; कामापुरते साहेबाशी गोड बोलायचे, असे कोणीतरी सांगणारा भेटतो

जास्त विचार करायचा नाही, विषयआर या पार करायचा; असा कोणीतरी बोलतो
तुकडा पाडून चालत नाही, “सुवर्णमध्य गाठावा हा विचार देखील पटून जातो

लग्न?; इतक्यात कुठे करतो? जरा सेटल हो!, म्हणून घरी "इतक्यात नकोअसे सांगतो
कोणीतरी; लवकर करून सुद्धा सेटल झाला, वय वाढायचे थांबते का?; हे ऐकून पुन्हा गोंधळून जातो

बायको नोकरीवाली नको, घर सांभाळणारी असावी; हा विचार साधा असतो
एकट्याने कमवून भागत नाही, आजकाल; नोकरीवाली बायको असावी; हा विचार सुधा कुठे वाईट असतो?

अहो; मोबाईल बाबतीत पण, मी पन्नास सल्ले ऐकतो
ऐकू येते ना राहू दे जुना, - अरे जरा लेटेस्ट घे; अश्या दोन्ही बोलण्याने गोंधळून जातो

मोठी गाडी; हि उधळपट्टी राहता, गरज झाली हे मी समजून घेतो
अरे; बस-रिक्षा असताना, कशाला  रे लागती कार? नुसती साली उधळपट्टी!!! हे पण मी पचवतो

एकच भारी बुटाचा; महागडा जोड घ्यावा, आणि दोन वर्षे वापरावा; असे म्हणून मी खरेदी करणार असतो
अरे स्वस्तात घे!!! आणि दर सहा महिन्याला नवीन बदल; असे ऐकून खरेदी रद्द करतो 

क्रिकेट!!! साला नुसता वेळेचा अपव्यय; आणि लाईटचा खर्च, आपल्याला काय मिळते त्यातूनअसे ऐकून बघत नाही
आपला देश त्यात एवढा पुढे आहे; कौतुक करायला कसला चिंधीपणा, असे कोण म्हणाले कि;आयपीएल बघायचे सोडत नाही

नोकरी मध्ये सुद्धा; सर्टीफिकेशनला महत्व असते; असे ऐकून चौकशी करतो
इतका अनुभव आला, आता कशाला सर्टीफिकेशन? असे ऐकून नाद सोडून देतो

ऑनसाईट कशाला हवे? नुसता देखावा असतो, तिकड राहणे अवघड; म्हणून मी कधी वाट्याला जात नाही
अरे; गेलास तर आत्ताच संधी आहेनंतर कधी कमावशील??? हा विचारही मन सोडीत नाही  

मस्त! सेल लागला आहे, स्वस्तात खरेदी करू; असे म्हणून धावत जातो
अरे! असल्या सेलमध्ये; खराब वस्तू असतात, म्हणून रिकाम्या हाती परत येतो

तब्येत चांगली राहायला, जिम पाहिजे!, असे ऐकून;माहिती काढून; लवकर उठायची तयारी करतो
आमच्या वेळेला कुठे जिम होत्या? नुसते चालले कि झाले!, असे ऐकले; कि आमचा बेत रद्द होतो

एवढे सगळे ऐकून; आणि परत सोडून देऊन, माझे काहीच नक्की झाले नाही
बघा; विचार करा; अहो! त्या माकडाच्या घराच्या गोष्टीसारखे; अश्याने कुणाचे; कधीच काही व्हायचे नाही

थोडक्यात काय?; जितके लोक तितक्या पद्धती, आता सोडला आहे नाद; फुकट सल्ला पाळण्याचा
आता ठरवले आहे; आपल्या मानत जे येईल, त्यावरच विचार करायचा आणि बस तुकडा पाडायचा


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

3 comments:

LIKE Saarthbodh !!!