About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, May 3, 2011

कविता:- न जाणे कोणी; कसा हातचा; तो एक क्षण निसटला

Poem Published in Antaraal E-magazine.
Link:- http://antaraal.com/e107_v0617/content.php?content.2558
---------------------------------------------------------------------------
सूर लागला माझा तेंव्हा; लयीला नेमका हरपला
जाणे कोणी; कसा हातचा; तो एक क्षण निसटला

नजरेत माझ्या दृष्टी येता; सृष्टी ओळखाया चुकला
न जाणे कोणी; कसा हातचा; तो हि एक क्षण निसटला

ताल मिळाला जेंव्हा आयुष्याचा; तोल नेमका हरपला
जाणे कोणी; कसा हातचा; तो हि एक क्षण निसटला

शब्द सुचले जेंव्हा काहीनाद ऐसा हरपला
जाणे कोणी; कसा हातचा; तो हि एक क्षण निसटला

शक्ती येता पायामध्ये; वाट नेमकी विसरला
जाणे कोणी; कसा हातचा; तो हि एक क्षण निसटला

अपयश येता अंगाशी; नवी झेप घ्याया विसरला 
जाणे कोणी; कसा हातचा; तो हि एक क्षण निसटला

संधी येता दाराशी ती; नेमकी ओळखाया चुकला     
जाणे कोणी; कसा हातचा; तो हि एक क्षण निसटला

असेच किती तरी अमूल्य  क्षण; पकडाया मी विसरला
आता मात्र हर एक चूक; सुधाराय  विसरला

असे काय झाले आयुष्य बदलले; फरक एवढा का पडला
उत्तर एकची मला माझा; गुरु खास जो भेटला.  

अपयश अन्   नाउमेदीचे; डोंगर झाले चीतपटाला
गुरु भेटता सुरुवात झाली; नव्या विजयी पर्वाला


© सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

No comments:

Post a Comment

LIKE Saarthbodh !!!